मालिश केल्यामुळे बाळाचे आई-वडिलांशी एक छान गोड नाते जडते. शिवाय आई-वडिलांशी त्याचा छान संवाद होतो. दोहोत पूल बांधला जातो. कारण तोपर्यंत बोलू न शकणारे बाळ स्पर्शातून बरेच काही सांगून जाते. स्पर्शाचे बाळाच्या जीवनात फारच महत्व असते. म्हणूनच बाळाची मालिश ही संवाद साधण्याची संधी मानले पाहिजे.
मालिश करण्याची कारणे * मालिश करण्यामुळे बाळ सक्रिय, जागृत आणि शांत अवस्थेत असते.
* मालिश केल्यामुळे बाळाचे वजन कायमचे वाढत राहते. प्रिमॅच्युअर अर्थात मुदतपूर्व प्रसुती झालेल्या बाळांच्या संशोधनात असे आढळून आले आहे, की दिवसांतून 3 वेळा 15 मिनिटांसाठी मालिश केली तर यांचे वजन इतर प्रिटर्म बाळांच्या तुलनेत 50 टक्के जास्त वाढते.
* मालिशमुळे बाळ आणि आई-वडिलांमध्ये एक प्रेमळ नाते जुळते. त्यामुळे माता-पित्यांना आपल्या बाळाशी संवाद साधता येतो.
* मालिश केल्यानंतर बाळ जी झोप घेतो ती त्याच्या मेंदूसाठी चांगली असते.
* मालिशमुळे मुलांच्या पोटाचे विकार उदा. गॅस, कॉलिक आणि अपचन इत्यादी कमी होते.
* मालिशमुळे मुलांचा मानसिक विकास चांगला होतो.
* मालिश आणि अन्य उत्प्रेरणामुळे बाळाच्या जाणीवा स्पष्ट होतात. शरीर व मन मोकळे होते. तणाव दूर होतो.
मालिश केव्हा करावी? मालिश दिवसांतून एक किंवा जास्त वेळा करू शकतो. बाळ शांत व जागृत अवस्थेत असते ती वेळ सर्वांत चांगली. बाळाला भूक लाकलेली असते, तो थकलेला असेल किंवा रडत असेल तर मालिश करणे टाळावे. नवजात बाळाला 3-5 मिनिटाच्या मालिशनेही बरे वाटते. दोन महिन्यांहून जास्त मोठ्या बाळाची मालिश जास्त वेळ करता येते.
|