1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य लेख

लठ्ठ्पणा, धुम्रपानामुळे ''कानपूर लाईन'' बंद

लठ्ठपणा असेल आणि त्यात धुम्रपान करत असाल तर लक्षात ठेवा तुमची 'कानपूर लाईन' बंद होऊ शकते. या दोन्हीमुळे तुमची ऐकण्याची क्षमता संपुष्टात येऊ शकते. अँटवर्प विद्यापीठाच्या एका गटाने प्रा. एरीक फ्रॅन्सेन यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या अभ्यासातून हा निष्कर्ष काढला आहे. विशेष म्हणजे मर्यादीत प्रमाणात अल्कोहोलचे सेवन केल्यास त्याने फायदा होतो, असेही या संशोधनात स्पष्ट झाले आहे.

धुम्रपान करत असाल आणि त्यात लठ्ठपणाही असेल शिवाय आजूबाजूला गोंगाट असेल तर ऐकण्याच्या क्षमतेवर मोठा परिणाम होतो, असे या संशोधकांनी स्पष्ट केले आहे. त्याचवेळी आठवड्यातून एकदा ड्रिंक घेतल्यास शरीरासाठी चांगले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. हे ड्रिंक्स म्हणजे वाईन, स्पिरीट किंवा बीअरचा एक ग्लास आहे. अति मद्यपान केल्यास काय याविषयीचा अभ्यास मात्र या संशोधकांनी केलेला नाही.
About Writer
एएनआय