हसण्यासाठी लोक क्लबमध्ये जातात...
|
| |
गेल्याने मानवाच्या चेहऱ्यावरील हरवलेले खिदळणे पुन्हा मिळवून देण्यासाठी हास्य क्लब सुरू झालेले आपल्याला दिसतात. दररोज सकाळी
एखाद्या उद्यानात अनेक लोक एकत्र येऊन मोठं मोठ्याने हसताना दिसतात. परंतु या हसण्यात कृत्रिमता असते त्यामुळे हे हास्य चेहऱ्यावर कायम राहत नाही. तिला केवळ आपण हसण्याची कला किंवा अभिनय म्हणता येईल. त्याचा मात्र मानवी मनावर तसेच शरीरावर सकारात्मक परिणाम जाणवत नाही.
आपण हसण्यासाठी हास्य क्लबमध्ये जात आहात? आपण कसेही, कोठेही, जसे पाहिजे तसे हसू शकता. याच्यासाठी कृत्रिम हास्याची मदत घेण्याची काय गरज?
एक फोन आला, तो बोलला - कोण बोलतंय? मी बोल बोललो - अरे मी बोलतोय? तो बोलला कमालच आहे, घ्या मिळाला हसण्यासाठी विषय.... यावरून दोघांमध्ये मोठ मोठ्याने हास्य सुरू होते.
तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रममाणे 'सुख पाहता जवा पाडे, दु:ख हे पवर्ताएवढे... ।' जणू प्रत्येक मानवाला याचा प्रत्यय येतांना दिसत आहे. मानवी आयुष्यात सुखापेक्षा दु:ख जास्त असल्याने त्याच्या जीवनात नैराश्य पसरले असून त्याला अनेक सामाजिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे जे हसणे मानवाच्या आजूबाजूला पडले आहे तेच उचलण्यासाठी त्याला हास्य क्लबमध्ये जावे लागते.
व्यक्ती मनाने जर प्रसन्न नसेल तरी तो हसतो आहे त्याला या कृत्रिम हसण्याने मजा येईल का? या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे.
जेव्हा व्यक्ती एखाद्या विनोदावर निखळ हसते तेव्हा त्याला ते आवरता येत नाही. परमेश्वरदत्त देणगी असलेले हास्य आपल्याजवळ असून देखील आपण जर लाफ्टर क्लबमध्ये जात असू तर आपल्यासारखा दुसरा कोणी मुर्ख नाही...
