''पुरूषाची जात'' दुर्मिळतेच्या उंबरठ्यावर
| |
डॉ. रॉबर्ट स्पॅरो असे त्यांचे नाव असून ऑस्ट्रेलियन मेडिकल स्टुडंट्स असोसिएशनच्या परिषदेत ते बोलत होते. या जगावर आता महिलाच राज्य करतील आणि पुरूषांची संख्या झपाट्याने कमी होत जाईल, असे त्यांचे भाकीत आहे. महिला पुरूषांविना प्रजोत्पादन करू शकतील, हे त्यामागचे कारण असल्याचे डॉक्टर महाशयांचे म्हणणे आहे.
गोठून ठेवलेल्या वीर्याच्या माध्यमातून स्त्रिया स्वतःच्याच शरीरात वीर्याची निर्मिती करू लागतील. तशी शारीर यंत्रणा त्यांच्या शरीरात निर्माण होईल. आणि आपोआपच प्रजोत्पादनासाठी त्यांना पुरूषांची गरज लागणार नाही, असे डॉक्टरांचे गृहितक आहे.
या पुरूषविहीन जगातही महिलांना मुलगा होण्याची शक्यता असेल. पण महिला मुली व्हाव्यात यासाठी प्रयत्न करतील. कारण त्यांचे आयुष्य पुरूषांपेक्षा जास्त असते. शिवाय त्यांना आयुष्यात संधीही पुष्कळ असतात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
