प्रमाणापेक्षा अधिक साखर खाणे शरीराला धोकादायक असते. त्यामुळे आपल्याला विविध प्रकाराच्या आजारांना सामोरे जावे लागते. आजच्या आधुनिक युगात मशिनच्या सहाय्याने काम करण्याच्या सवयीमुळे मानवाची शारीरीक क्षमता कमी होत चालली असून त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होताना दिसत आहे. अशा जीवनशैलीत साखर खाणे अधिक धोकादायक आहे. वजन वाढण्यासाठी चहा, चॉकलेट, आइसक्रिम, केक, मिठाई तसेच इतर गोड पदार्थ मोठे कारणीभूत ठरतात. याशिवाय शरीरात रक्ताचे प्रमाण जास्त असेल तर साखरेचे कण स्वत:ला रक्तात असलेल्या प्रोटीन्सशी सुसंगत होतात आणि एक मोठी रासायनिक संरचना तयार करतात.
त्यामुळे शरीरात मेंडीजेनरेशनची प्रक्रिया सुरू होते. या प्रक्रियेमुळे मोतिबिंदू, त्वचेवर सुरकत्या पडणे, आणि कॅन्सर सारखे आजार शरीराला जडतात.
हे सर्व शरीरातील पेशीत झालेल्या बदलामुळे होत असते. त्यामुळे अधिक साखर खाण्यासाठी आपले तोंड नेहमी उघडत असले तरी जीवनाला मात्र आजाराची कडवट चव येऊ शकते. विशेष म्हणजे आपण कच्च्या साखरेचे सेवन केल्यास त्याचा अधिक विपरीत परिणाम होतो. त्यासाठी साखर खाण्याच्या हव्यासाला दूर ठेवणे आवश्यक आहे.
|