त्वचेच्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका
|
उन्हाळ्यात काखेत व मांड्यांमध्ये घाम येत असल्याने तेथे खाज सुरू होऊन त्वचेच्या आजाराला सुरवात होते. व्यक्ती त्या जागी खाजवून खाजवून हैराण होऊन जातो. त्यात काही रूग्ण डॉक्टरांकडे न जाता सरळ मेडिकलमधून औषधे घेऊन उपचार सुरू करतात. त्यातील काही औषधांमध्ये सल्फ्युरिक एसिड असल्यास खाज येत असलेल्या जागी लावल्याने ती जागा जळते. त्याने रुग्णास अधिक वेदना सुरू होतात. त्यामुळे त्वचेवर कुठल्याही भागात खाज येणे सुरू झाले तर सर्वात आधी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
पावसाळ्यात लहान मुलांच्या चेहरर्यासह संपूर्ण त्वचेवर बारीक बारीक पुटकळ्या होतात. काहीच्या पुटकळ्यात पस जमा होऊन त्या पिवळ्या दिसायला लागतात. त्याला वैज्ञानिकांच्या भाषेत 'इंपेटिगो' असे म्हणतात. तर सामान्य नागरिकांमध्ये त्याला घामोळ्या म्हटले जाते.
|

