1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य लेख

जीवघेणा मलेरिया

ND
'मलेरिया' हा आजार दरवर्षी शेकडोंचा जीव घेतल्याशिवाय राहत नाही. यापासून वाचण्यासाठी बरेच उपाय आहेत. मात्र, जनमानसात त्याच्या प्रचार प्रसाराचा अभाव असल्याने सामान्य नागरिक त्यांपासून वंचित राहत आहे. घराच्या आसपास पावसाचे पाण्याचे डबके साचू देऊ नका तसेच मच्छरदाणी लावूनच झोपावे. अशा लहान लहान गोष्टींकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष दिल्यास मलेरियापासून आपण मुक्त होऊ शकतो.

गेल्या वर्षी भारतातील 18 लाख नागरिकांना मलेरिया झाला होता. जगात दरवर्षी 30 ते 50 कोटी नागरिक मलेरियाने ग्रस्त असतात. त्यापैकी हजारो नागरिक मृत्यूच्या खाईत ढकलले जातात. जगात प्रती 30 सेकंदांना 1 बालक मलेरियाला बळी पडतो. गेल्या काही वर्षापासून फेल्सीपेरम मलेरियाने तर कहर केला आहे. डॉक्टराच्या म्हणण्यानुसार मानवी आरोग्यास तो खूप धोकादायक आहे.

कसा होतो मलेरिया?
'मलेरिया' हा आजार एका विषाणूच्या संक्रमणाने होत असून तो एनोफिलिस जातीचा डास चावल्याने होतो. मानवाच्या शरीरात विषाणू प्रवेश करून पोटात जातात व आपली संख्या वाढवितात. त्यानंतर तांबड्या रक्त पेशींमध्ये ते स्वतःहून मिसळतात.

'मलेरिया'चे चार प्रकार-
(1) प्लासमोडियम फेल्सीपेरम.
(2) प्लासमोडियम वाइवॅक्स.
(3) प्लासमोडियम मलेरिया.
(4) प्लासमोडियम ओवेल.
प्लासमोडियम फेल्सीपेरम व प्लासमोडियम वाइवॅक्स हे कमी क्षमतेचे आजार आहे मात्र, फेल्सीपेरम मलेरिया सर्वात धोकेदायक असून याचे संक्रमण झपाट्याने होते.

कसा पसरतो मलेरिया-
'मलेरिया' एक विषाणूपासून संक्रमित केला जातो. या विषाणूचे संक्रमण डास चावल्याने होते. डास चावत असताना रक्त ओढत असतो, त्या दरम्यान मलेरियाचा विषाणू शरीरात प्रवेश करतो व सरळ पोटात जाऊन बसतो. त्या ठिकाणी तो आपली संख्या वाढवतो. 8-9 दिवसात ते विषाणू मोठे होतात व तांबड्या रक्त पेशींवर हल्ला चढवितात. तेव्हा त्या ठिकाणी ही ते त्यांची संख्या वाढवितात.

कोणता डास धोकादायक-
'एनोफिलिस' जातीचा डास मलेरियाच्या विषाणूंचे संक्रमण करतो. मलेरिया झालेल्या व्यक्तीला हा डास चावतो व रक्त शोषत असताना मलेरियाचे विषाणू डासाच्या शरीरात प्रवेश करतात. तोच डास मलेरिया न झालेल्या व्यक्तीला चावतो तेव्हा त्याच्या शरीरात ते विषाणू प्रवेश करतात व त्याला ही मलेरियाची लागण होते.

मलेरियाची लक्षण
ताप, डोकेदुखी, उलटी आदी लक्षणे मच्छर चावल्यानंतर 10 ते 15 दिवसांमध्ये व्यक्तीला जाणवतात. वेळीच उपचार केला नाही तर अधिक धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. कारण मलरिया झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील महत्त्वपूर्ण भागांना रक्त पुरवठा होत नाही. त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता वेळेतच उपचार करावा.

उपचार कसा करावा?
मलेरियाचे निदान होणे आधी गरजेचे आहे. वेळेत त्यावर उपचार सुरू केले तर त्याला आपण आटोक्यात आणू शकतो व त्याचा कालावधी आपण कमी करू शकतो. क्लोरोक्वीन अथवा कुनॅन ही औषधे मलेरियावर फायदेशीर ठरू शकतात. तसेच मलेरियावर एस्प्रीन, डिस्प्रीन व ब्रुफेन आदी औषधांचे नियमित सेवन करावे. मात्र, यांचे अतिसेवनही धोकेदायक होऊ शकतो. लहान बालकांना ताप व अंग दुखी असे लक्षणे आढळल्यास त्यांना सर्वप्रथम पॅरासीटामलच्या गोळ्या द्याव्यात. त्यानंतर फरक जाणवला नाही तर रक्त तपासून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मलेरिया झालेल्या व्यक्तीने खूप पाणी प्याले पाहिजे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा