1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य लेख

नाजूक डोळ्यांची काळजी घ्या

ND
डोळे आहेत म्हणूनच मानवाच्या आयुष्यात प्रकाश आहे, नाही तर त्यांचे जीवन देखील अंधकारमय झाले असते. याच डोळ्यांनी आपण जागे असताना जग बघतो तर निद्रावस्थेत आपण छानसे स्वप्न पाहतो. पंचज्ञानेंद्रियांमध्ये डोळ्यांना महत्त्वाचे स्थान आहे. जर नाजूक व रसपूर्ण डोळेच दिले नसते तर मानवाचे जीवन असून नसल्यासारखे झाले असते.

सुंदर डोळे हे प्रत्येकाला आपल्याकडे आकर्षित करत असतात. जगातील सर्वात सुंदर असण्याचा किताब पटकावणाऱ्या ऐश्वर्या रॉयने ही तिच्या सुंदर डोळ्यांनी जगाला भुरळ घातली आहे. डोळ्यांमध्ये अशी देखील चमक असते की, कोणी त्यात पाहिले तर तो त्या व्यक्तीच्या अधीन होऊन जातो. केवळ स्त्रियांचे डोळे सुंदर असतात असे नाही तर पुरुषांचे ही डोळे सुंदर असतात ते देखील त्यांच्या डोळ्यावर चारचौघात इतरांचा आकर्षण बिंदू होतात.

आजच्या धकाधकीच्या जीवनात व्यक्तीला त्याच्या स्वास्थ्याकडे पाहायला वेळ नाही मात्र, त्याच्या जीवनात रस भरणाऱ्या सुंदर डोळ्यांकडे तरी त्याने दुर्लक्ष करून चालणार नाही. कमी वयात चश्मा लागणे, डोळ्यांच्या खाली काळे वलय तयार होणे, पापण्यांवर सूज येणे, डोळ्याची जळ जळ होणे, डोकेदुखी या सारख्या डोळ्यांशी संबंधित आजारांचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढले असल्याचे जाणवते. वेळेत त्यांच्याकडे लक्ष दिले नाही तर त्या अधिक धोकेदायक ठरू शकतात.

जेव्हा आपण कॉम्प्युटर व टी. व्ही समोर बसतो तेव्हा डोळ्यांवर जास्त ताण पडतो. त्यांच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात बाहेर पडणारे विद्युत तरंग नाजूक डोळ्यांना हानी पोहचवतात. त्याने आपल्या मेंदूतही तणाव निर्माण होतो. याव्यतिरिक्त प्रदूषण, धूळ, माती आदीपासून ही आपल्या डोळ्यांना मोठी हानी पोहचते.

ND
आपल्या सुंदर डोळ्यांची काळजी घेण्यासाठी :-

* दिवसभरातून दोन ते तीन वेळा डोळे थंड पाण्याने धुतले पाहिजे.
* डोळ्यासाठी कमीत कमी सात तासांची झोप आवश्यक आहे.
* घरातून बाहेर पडण्याअगोदर गॉगल लावणे आवश्यक आहे.
* जास्तीत जास्त प्रमाणात हिरवे पालेभाज्यांचे दररोजच्या आहारात सेवन केले पाहिजे.
* अधिक प्रमाणात पाणी पिले पाहिजे.
* डोळ्यामध्ये शक्य होईल तेव्हा आय क्रीम घातले पाहिजे.
* सकाळी किंवा सायंकाळी हिरव्या गवतावर विनापादत्राणे फेरफटका मारला पाहिजे.
* नेहमी चांगल्या क्वॉलिटीच गॉगल वापरला पाहिजे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा