निरोगी जीवनाचा मंत्र
पृथ्वी (जमीन), जल (पाणी), अग्नी (प्रकाश), वायू (वारा) व नभ (आकाश) या पाच तत्त्वापासून आपले शरीर बनलेले आहे. आपल्या प्रत्येक पेशी याच तत्त्वांपासून बनल्याने नैसर्गिक जीवनशैलीच्या जास्तीत जास्त जवळ राहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तरच तर आपण सदैव ताजेतवाने व निरोगी राहू शकू.
जमीन-
* जमिनीवर अनवाणी पायांनी किंवा गवतावरील दवबिंदूवरून चालण्याने डोळयांना थंडावा मिळतो.
* गवतावर कधी तरी झोपल्याने शरीराचा थकवा दूर होतो.
पाणी-
* दिवसभरात कमीत कमी तीन लीटर पाणी प्यावे.
* सकाळी शुध्दोदकाने आंघोळ केल्याने शरीरातील सर्व रंध्रे मोकळी होतात. त्यामुळे उत्साही वाटते व शरीराचे रक्ताभिसरणही सुधारते. उटणे, मुलतानी माती यांचा उपयोग शरीर स्वच्छतेसाठी करता येतो.
* आंघोळीपूर्वी खरखरीत पंचाने रगडून आंघोळ केल्यास जास्त फायदा होतो.
* तहान लागल्यास घोट घोट सावकाश पाणी घ्यावे.
* पावसाळ्यात पाणी उकळून व गाळून प्यावे.
* जेवण करताना गरज पडल्यास एक ते दोन घोट पाणी प्यावे. मात्र, ढसाढसा जास्त पाणी पिऊ नये कारण त्याने जठराग्नी मंद होतो.
* जेवणापूर्वी अर्धा तास किंवा जेवणानंतर अर्ध्यातासाने पाणी प्यावे.
प्रकाश-
* घरात योग्य प्रकाश असावा. कोवळा सूर्यप्रकाश आपल्याला उत्साही बनवतो तर सूर्यप्रकाशामुळे आपल्याला 'ड' जीवनसत्त्वांचा लाभ होतो.
वारा-
* घर हवेशीर असावे.
* झोपण्याच्या खोलीतील खिडक्या योग्य व उघड्या असाव्यात.
* शक्य होईल तेव्हा मोकळ्या हवेत झोपावे.
* सुर्योदयापूर्वी उठावे व फिरायला जावे किंवा व्यायाम करावा.
आकाश-
* आकाश म्हणजे अवकाश, मोकळेपणा, शरीरासाठी उपास करणे हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.
* शरीराचे चयापचय योग्य ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा उपास, फलाहार, रसाहार गरजेचा आहे.
* उपासात लिंबू, पाणी, मध या बरोबरच फळे दिवसातून 3 ते 4 वेळा घ्यायला हवीत. त्यामुळे मन शांत होते व पचन संस्थेचे कार्य सुधारते.
|