1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य लेख

आरोग्यसंपन्न जीवनासाठी...

आरोग्यसंपन्न जीवनासाठी
आपले शरीर पंचमहाभूतांनी बनलेले आहे. या महाभूतांना अनूकूल अशी आपली दिनचर्या असावी. पण त्याचबरोबर इतरही काही बाबींचे पालन आपण केले पाहिजे. व्यायाम नेहमी करणे गरजेचे आहे. योग्य आहार घ्यायला हवा. शरीराला विश्रांतीही चांगली मिळाली पाहिजे. या सगळ्या बाबींचे योग्य पालन केले पाहिजे. तरच शरीर आरोग्यसंपन्न राहील. त्यासाठीच खाली दिलेल्या सूचना पाळा.

ND
* चांगल्या आरोग्यासाठी विश्रांती अत्यावश्यक आहे.
* झोपायला पातळ गादी व लाकडी पंलग वापरावा.
* झोपेमुळे तन आणि मन दोन्ही शांत होतात. योग्य प्रमाणात झोप घेतल्याने दुसर्‍या दिवशी आपण पुन्हा नवीन कामासाठी तयार होतो.
* निद्रानाश असणार्‍यांनी गरम पाण्याने आंघोळ करणे उत्तम.
* झोपताना तोंडावर पांघरून घेऊ नये.
* 6 ते 8 तासांची झोप पुरेशी आहे.

ND
चांगले आचरण-
* शरीर व मन निरोगी राहण्यासाठी सदाचार हा महत्त्वाचा आहे.
* नेहमी खरे बोला कारण त्याचा नंतर तुम्हाला त्रास होणार नाही.
* दुसर्‍यांच्या वस्तुंवर अधिकार दाखवू नका.
* जीवन संयमाने जगा.
* अतिसंग्रह टाळा.
* शरीर स्वच्छ ठेवताना इर्षा, द्वेष, अहंकार, घृणा यासारखा वाईट विचार मनातून दूर सारा.
* आपल्या क्षमतेनुसार फळ मिळविण्यासाठी जरूर प्रयत्‍न करा पण मनात लोभ व तृष्णा असल देऊ नका.
* शरीर, प्राण, इंद्रीये आणि मनाला योग्य आचार विचारांनी बध्द ठेवा.
* आत्मिक उन्नतीसाठी नियमित वाचन, मनन, लेखन कर.

प्रार्थना-
* आपल्या श्रध्देनुसार पूजाअर्चना करा. त्यामुळे मनावरील तणाव दूर होऊन आत्मबळ वाढते. तसेच निराशा, मानसिक विकार दूर होऊन न्यूनगंडाची भावना कमी होते.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा