1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य लेख

हार्नियाकडे दुर्लक्ष करू नका

ND
आजच्या धावपळीच्या युगात तसेच कामाच्या व्यापात आपण आपल्या आरोग्याकडे फारसे लक्ष देत नाही. त्यामुळे छोटी छोटी दुखणी भविष्यात गंभीर स्वरूप धारण करतात. सुरवातीलाच त्याचा इलाज केला असता तर बरे झाले असते, असे आपण साप गेल्यानंतर काठी जमिनीवर आपटल्यासारखे बोलतो. हार्निया हा देखील अशाच प्रकारचा आजार आहे. त्याकडे दुर्लक्ष करणे हे काही वेळेस खूप महागात पडू शकते.

हार्नियाने आज मोठ्या प्रमाणात लोक पीडीत आहेत. परंतु, त्याच्या वेदना वाढतात तेव्हा ते डॉक्टरांकडे उपचारासाठी जातात. तेव्हा वेळ निघून गेलेली असते व ऑपरेशन करण्याशिवाय कुठलाच उपाय शिल्लक नसतो.

हार्निया हा पुरूष तसेच महिलांनाही होऊ शकतो. पण प्रामुख्याने तो पुरूषांना मोठ्या प्रमाणात होतो. वयाच्या पन्नाशीनंतर हार्निया होण्याची भीती जास्त असते.

हार्नियाची लक्षणे-
* पोटाची चरबी किंवा आतडे बाहेरच्या बाजूने येणे.
* त्वचेच्या आत सूज येणे.
* सुजलेल्या भागात त्रास होणे.
* उभे राहता न येणे तसेच लघवी करताना वेदना होणे.

उपचार-
हार्नियाला एकमेव उपचार म्हणजे त्याचे ऑपरेशन होय. दुर्बिण पद्धतीने हार्नियाचे ऑपरेशन केले जाते. कमी कालावधी ऑपरेशन असते. काही तासातच व्यक्ती फिरायला लागतो. हे बिन टाक्याचे ऑपरेशन असते. पोटाचा चरबीचा भाग वर आल्याचे लक्षात आल्यास तत्काळ डॉक्टरांना दाखवून त्याचे निदान करावे. हर्नियाचे निदान झाल्याचे त्यावर लागलीच उपचार करावा. त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. नाही तर भविष्यात त्रास वाढण्याची शक्यता असते.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा