1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य लेख

झोपण्याची पद्धत व स्वभाव

झोपण्याची पद्धत व स्वभाव
ND
प्रत्येक व्यक्ती त्याच्या सवयीनुसार झोपत असतो. झोपताना मनस्थिती चांगली असेल, म्हणजेच मनात वाईट विचार येत नसतील तर चांगली झोप लागते. मात्र, मनात विविध विचारांचे थैमान माजले असेल तर रात्र या कुशीवरून त्या कुशीवर करण्यात जाईल.

बहुतेकांचे शरीर एका ठिकाणी तर मन हे दुसरीकडेच हुंदडत असते. मन व शरीर यांना एका ठिकाणी केंद्रित करता येत नाही. अशा व्यक्तींना रात्री शांत झोप लागत नाही. काही व्यक्ती अशा असतात की, अंथरुणावर पडल्या पडल्या त्यांना शांत झोप लागते. व्यक्तीच्या झोपण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात व त्यावरून त्यांच्या स्वभावांची ओळख होते.

काही व्यक्ती दोन्ही पायांची घडी करून झोपतात. त्याला नकारात्मक समजले जाते. अशी माणसे भित्र्या स्वभावाची असतात. अशा व्यक्ती समाजात पुढे पुढे करणार्‍या असतात. मात्र, वेळ आली तर पळवाटा शोधत असतात. आपल्या कुटुंबातील लहान मूल असे झोपत असेल तर त्याच्या पायाची घडी काढून टाकावी. आपण त्याच्या दररोजच्या झोपण्याच्या पद्धतीत बदल केला तर त्याला सरळ झोपण्याची सवय लागेल.

ND
काही व्यक्ती झोपताना दोन्ही हात दोन्ही पायांच्या मध्ये घेऊन झोपतात. झोपण्याची ही पद्धत दर्शवते की, त्या व्यक्तीला थंडी वाजत आहे. त्यामुळे त्याच्या अंगावर पांघरूण दिले पाहिजे. काही व्यक्ती एका कुशीवर झोपतात. अशा पद्धतीने झोपताना व्यक्ती खालचा पाय सरळ व वरचा पाय हा गुडघ्यापासून मोडलेल्या अवस्थेत ठेवतात. अशा झोपण्याच्या स्थितीला बेसावधगिरीचे प्रतीक समजले जाते.

शरीराने जाड असलेल्या व्यक्तीला कुशी बदलवता येत नाही. बहुतेक जाड व्यक्ती झोपताना त्यांचे हात पोटावर ठेवून झोपतात. अशा पद्धतीने लहान मुलेही झोपताना दिसतात. मात्र, ते झोपतच जोरात रडायला लागतात. लहान मुलांना स्वप्ने पडत असल्याने पोटावर अथवा छातीवर हात ठेवून झोपण्याची त्यांची सवय लहानपणीच मोडली पाहिजे.

काही व्यक्तींना झोपताना एका पेक्षा जास्त उशी घेण्याची सवय असते. अशा व्यक्ती निरर्थक गोष्टींकडे जास्त लक्ष देतात. तसेच अशा व्यक्तींना आराम करणे अधिक आवडते व ते भावुक स्वभावाचे असतात. याउलट अशा काही व्यक्ती असतात की त्यांना उशीची गरज भासत नाही, ते उशीविना झोपतात. अशा व्यक्ती नियमानुसार वर्तन करतात. मात्र, अशा व्यक्तींना कधी राग येईल, हे सांगता येत नाही.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा