वजन असे कमी करा
|
पण डाएटिंग हे फॅड बनले आहे. दिवसभर उपाशी राहून फिगर मेंटेंन करायचे जणू वेडच लागले आहे. डाएटिंगमुळे वजन कमी जरूर होईल. पण ते थोड्या काळासाठी असते. काही दिवस डाएटिंग केल्यानंतर तुम्ही परत जेवणाच्या जुन्या प्रमाणाकडे वळाल. मग परत वजन वाढणे सुरू होते.
तुम्हाला निरोगी शरीर हवे असेल तरआपल्या आहारासंबंधी गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे. दिवसाची सुरुवात व्यायामाने केली पाहिजे. त्याच बरोबर एक डाएट चार्टसुद्धा बनवायला हवा.
वजन वाढण्याचे कारण
असमतोल आहार, व्यायामाकडे दुर्लक्ष यामुळे वजन वाढते. शरीरात अतिरिक्त चर्बी साठते. शरीर स्वस्थ असेल तर तुम्ही मानसिकरित्या सुद्धा स्वस्थ राहता. लठ्ठपणामुळे मधुमेह, रक्तदाब सारखे आजार होण्याची शक्यता प्रबळ होते.
लट्ठपणा कमी करण्यासाठी
* दर रोज सकाळी किमान 40 मिनिटांपर्यंत फिरायला पाहिजे.
* दिवसभरात 3 ते 4 लिटर पाणी व अर्धा लिटर फळांचा रस प्यायला हवा.
* सकाळच्या वेळेस पेयपदार्थयुक्त हलका नाश्ता केला पाहिजे, दुपारच्या वेळेस जेवणासोबत सलाद व दही आणि संध्याकाळी फळ व भाज्यांचा समावेश केला पाहिजे.
* असमतोल आहार हे लट्ठपणाचे मोठे कारण आहे. म्हणून जेवण असे घ्या की जे पचायला सोपे आहे.
* डाएटिशियनकडून आपल्या वजनानुरूप कॅलरी चार्ट बनवायला हवा व त्या चार्टप्रमाणे जेवण घ्यायला पाहिजे.
