1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य लेख

मधुमेहींसाठी आहार

लिंबाचा रस काकडी गाजरपालक
ND
मधुमेह फार मोठ्या प्रमाणात पसरलेला आजार आहे. हल्ली तर लहान वयातच मधुमेह होत असल्याची उदाहरणे आहेत. म्हणूनच ह्या रूग्णांसाठी आहारविहारांचे नियोजन जाणून घेऊया.

लिंबाचा रस - मधुमेही रूग्णांना तहान जास्त लागते. या अवस्थेत त्यांनी लिंबाचा रस प्यायला हवा. त्याने त्यांची तहान भागते.

काकडी खाल्ल्याने भूक शांत होते - मधुमेही रूग्णांनी थोडा कमी आणि हलका आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे त्यांना सारखी भूक लागते. काकडी खाल्ल्याने भूक शांत होऊ शकते.

ND
गाजर-पालकाचा रस - ह्या रूग्णांनी डोळ्यांसाठी गाजर आणि पालकाचा रस प्यायला हवा.

बीट रामबाण औषध आहे - मधुमेही रूग्णांना बीट, दुधी भोपळा, गिलकी, पालक, पपई इत्यादी भाज्यांचा वापर जास्तीत जास्त करायला हवा. बीटाने रक्तात असलेल्या साखरेची मात्रा कमी होऊ लागते. म्हणून बीट भाजी, परोठे, सलाड आदी प्रकारे खावी.

ND
जांभुळ खा. - मधुमेहावर जांभूळ एक पारंपरिक औषध आहे. ह्या फळांना मधुमेहींचे फळही म्हणतात. या फळाची बी, साल, रस आणि गर सर्व मधुमेहींसाठी गुणकारी आहे.

जांभळाच्या बिया एकत्र करून ठेवाव्यात. त्यात जांबोलीन नावाचा घटक असतो. स्टार्चचे साखरेत रूपातंर करण्यापासून तो रोखतो. या बियांची बारीक पूड करून ठेवावी आणि दिवसातून 2-3 वेळा पाण्यासोबत घ्यावी. यामुळे साखरेचे प्रमाण कमी होते.

कारल्याचा वापर करावा - पूर्वीच्या काळापासून कारल्याचा प्रयोग मधुमेहींच्या औषधाच्या रूपात केला जात आहे. याचा कडू रस साखरेचे प्रमाण कमी करतो. मधुमेही रोग्यांना याचा रस रोज प्यायला द्यायला पाहिजे. उकळलेल्या कडुलिंबाचा रस प्यायल्यास चांगले.

मेथीचा वापर गुणकारी - मधुमेही रोग्यांनी मेथीदाणे पोटात जाऊ द्यावेत. मेथी दाण्याची पूड आता बाजारापर्यंत आली आहे. या पुडीमुळे मधुमेहावर नियंत्रण राहू शकते. हे चूर्णं सकाळी उपाशी पोटी 2 चमचे घ्यायला हवे. काही दिवसांत याचे चांगले परिणाम दिसून येतात.

अन्य उपचार :
रोज दोन चमचे कडू लिंबाचा रस, चार चमचे केळीच्या पानांचा रस सकाळ-संध्याकाळ घ्यायला हवा. आवळ्याचा रस 4 चमचे घेतल्यानेसुद्धा फायदा होतो.

सूचना - वर दिलेला सल्ला अमलात आणण्यापूर्वी आपल्या डॉक्टराचा सल्ला जरूर घ्यावा.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा