कॉन्टॅक्ट लेन्स म्हणजे काय? उच्च प्रतीच्या प्लॉस्टिकपासून तयार केलेला अत्यंत पारदर्शक रचना म्हणजे कॉन्टॅक्ट लेन्स. लहान आकाराच्या हे लेन्स डोळ्यात व्यवस्थित बसविण्यात येतात. त्या कशा उपयोगात आणायच्या याचे प्रशिक्षणही निष्णात डॉक्टर देतात. सामान्यतः आपल्या मनात भीती बसलेली असते ती म्हणजे लेन्स डोळ्यात घालताना तुटली फुटली तर? त्यामुळे डोळ्यांना नुकसान पोहचेल अथवा आपण सहजरित्या घालू व काढू शकू की नाही. परंतु अत्यंत हुशार व निष्णात डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली कॉन्टॅक्ट लेन्स प्रॅक्टीस करून बनविलेल्या कॉन्टॅक्ट लेन्स कोणीही सहजपणे वापरु शकता. कोणत्या व्यक्तींनी कॉन्टॅक्ट लेन्स वापरणे हितावह आहे. 1. चष्मा नंबर खूपच प्लस (+) अथवा माईनस (-) असेल अशा व्यक्तिंनी लेन्स वापरणे खूपच हितावह. 2. मोती बिंदू शस्त्रक्रियेनंतर. 3. एस्टीगमेटिझम (सर्वसाधारणपणे डिग्रीवाला वरचा नंबर असेल व योग्य रितीने दृष्टीच (पाहणं) एडजेस्ट होत नसेल तर) 4. केरोटो-कोनस म्हणजे बुबुळ शंकूच्या आकाराची झाल्याने चष्म्यात दृष्टी सुधारत नसेल तर लेन्सशिवाय पर्याय नाही. 5. रंगमंचावर काम करणारे कलाकार व मैदानावर खेल खेळणारे खेळाडू यांच्यासाठी कॉन्टॅक्ट लेन्स अति उत्तम. 6. चष्मा घालणार्या तरुण मुली ह्या सहकारी, मित्रमैत्रणी व इतरांकडून नेहमीच चेष्टेचा विषय बनतात. लग्नप्रसंगी याचा प्रत्यय नेहमी अशा वेळी तर तरुणींना कॉन्टॅक्ट लेन्स म्हणजे पर्वणीच. कॉन्टॅक्ट लेन्सचे प्रकार 1. हार्ड कॉन्टॅक्ट लेन्स2. सेमी-सॉफ्ट (गेस परमीअॅबल) कॉन्टॅक्ट लेन्स. 3. सॉफ्ट कॉन्टॅक्ट लेन्स.कोणती कॉन्टॅक्ट लेन्स योग्य ते तुमचे डॉक्टर ठरवतील. डॉक्टरच्या सल्ल्यानेच तुम्ही लेन्स वापरा.कॉन्टॅक्ट लेन्स महाग का? लेन्स वापरात आणण्यापूर्वी बुबळाचे तंतोतंत माप परदेशातून आणलेल्या केरोटो मीटरच्या सहाय्याने घ्यावयाचे असते. लेन्स सुद्धा अत्यंत पातळ, कसून तपासणी करुन व उच्च प्रतीच्या टेक्निकनी यांत्रिक बनवतात. हे सर्व साहित्य परदेशातून येते. डॉक्टरचे योग्य मार्गदर्शन व फॉलोअपची सुविधा आपणास तेथे मिळते ती सर्व अती उच्चतम असते. चष्मापेक्षा लेन्सने जास्त दिसते. तुमची कमतरतेशिवाय पाहण्याची उपयोगिता ही तुम्ही खर्चलेल्या किंमतीपेक्षा सरासरीत उच्च आहे. कॉन्टॅक्ट लेन्स घालताना व काढताना घ्यावयाची काळजी 1. बोटाची नखे संपूर्णपणे व्यवस्थित कापलेली असावीत. 2. लेन्स घालण्याआधी डोळे स्वच्छ धुवावेत व हातही साबणाने धुवावेत. 3. लेन्स साफ करण्याच्या द्रावणने साफ करुन नंतर पाण्यानी साफ करुन घालाव्यात. लेन्स डोळ्यात घालणे - पद्धत : लेन्स उजव्या हाताच्या पहिल्या बोटावर ठेवा. त्यामुळे लेन्सचा अंतर्गोल भाग वरच्या बाजूला राहील. डाव्या हाताच्या मधल्या बोटाने पापणी ओढून ठेवावी. आरशात पहात लेन्स हळूहळू बुब्बुळावर ठेवा नंतर डाव्या हाताने ओढून धरलेली पापणी सोडा. दोन्ही डोळ्यात लेन्स घालणेसाठी एकच पद्धत आहे. लेन्स काढण्याची पद्धत : उजव्या डोळ्यातील लेन्स काढताना डाव्या हाताचा तळवा हनुवटी जवळ ठेवा. म्हणजे लेन्स हाताच्या तळव्यावरच अलगद पडेल. उजव्या हाताचे पहिले बोट वरची पापणी व दुसर्या बोटाने खालची पापणी एकाकढून बाहेरच्या बाजूकडे ओढून घरावे. डाव्या बाजूला खाली पहात डोळा बंद करावा. म्हणजे लेन्स सहजपणे निघेल. डाव्या डोळ्यातील लेन्स काढताना उलट्या बाजूचा हात उपयोगात आणावा. लेन्स घालताना अथवा काढताना बोटाचे नख नाजूक असलेल्या बुब्बुळाला लागणार नाही याची काळजी घ्यावी. लेन्स कापडाने अथवा कागदाने पुसू नये. लेन्स काढल्यावर डबीत ठेवाव्यात. सेमी सॉफ्ट आणि लेन्स नेहमी सोकिंग सोल्युशन मध्ये बुडवून ठेवाव्यात. लेन्स डबीत ठेवताना अंतर्गोल असणारा भाग वरच्या बाजूस राहील असा ठेवावा. लेन्स घालण्याची पद्धत : सुरुवातीला पहिले दोन दिवस, दोन तास नंतर प्रत्येक दिवशी दोन-दोन तास वाढविणे. आठवडाभरात 12 ते 14 तासांपर्यंत घालता येईल. समजा एक आठवडा तुम्ही लेन्स वापरल्याच नाहीत तर पुन्हा वापरताना पहिल्या पद्धतीप्रमाणे वापराव्यात नहीतर डोळे लाल होणे, दुखणे अस त्रास होतो. झोपण्यापूर्वी लेन्स काढून ठेवा. डोळ्यात काजळ घालू नका व डोळ्याच्या बाजुला कॉस्मेटीक लावू नका. ठराविक काळानंतर वेळोवेळी डॉक्टरांकडून तपासून घ्यावे. काही त्रास झाल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा. |