1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य लेख

जीवघेणा ब्रेन ट्यूमर

NDND
ब्रेन ट्यूमर हा अतिशय धोकेदायक आजार आहे. त्याला मस्तिष्क कॅन्सरही म्हटले जाते. त्याच्यावर वेळीच उपाय योजना न केल्यास आपल्या जीवावर जाऊ शकते.

ब्रेन ट्यूमर 3 ते 15 वर्ष वयोगटामध्ये किंवा 50 वर्षाच्या व्यक्तीला होऊ शकतो. पुरुष किंवा महिला यांना कोणालाही हा आजार होत असतो. कर्करोगाचे विषाणूचे श्वसनक्रियेद्वारे आपल्या शरीरात संक्रमीत झाल्याने किंवा प्रदूषण हे हा आजार होण्यास कारणीभूत ठरत असतो.

डोके दुखीकडे आपण साधारण समजून दुर्लक्ष करत असतो. काही नागरिक तर त्यावर मेडिकल मधल्या 'पेन किलर' घेत असतात. त्याने ही फरक पडत नसला तर आपण औषधाची मात्रा वाढवत असतो व भविष्यातली डोके दुखीही वाढवून घेत असतो.

डोके दुकीची अनेक कारणे असू शकतात. साधारण तापापासून रक्तदाब, छाती दुखी व हृदयाचे विकार आदी आजार त्यामुळे होत असतात. त्यासाठी आपण डोके दुकीकडे दुर्लक्ष न केलेलेच बरे असते.

ब्रेन ट्यूमरचे लक्षणे-
* ब्रेन ट्यूमरचे पहिले लक्षण म्हणचे डोकेदुखी होय. सकाळच्या पहरी जास्त व जसजसा दिवस उजाळतो तसा कमी कमी होत असते.

* 'पेन किलर'ने डोके दुखीवर तात्पुर्ता आराम मिळत असतो. परंतु औषधीची क्षमता कमी झाल्यानंतर पुन्हा तीव्रतेने डोके दुखायला लागते.

* ब्रेन ट्यूमरमध्ये डोके दुखी व्यति‍रिक्त इतर लक्षणे ही आहेत. जसे की, वारंवार शरीराचा तोल जाणे, कमी ऐकू येणे तसेच दृष्टी कमजोर होणे आदी लक्षणे जाणवतात.

* मस्तिष्क अथवा त्या संबंधित क्रियामध्या अचानक परिवर्तन घडत असते. डोके जड पडणे, स्मरणशक्तीचा लोप पावणे, डोक्यासोबत मान दुखणे तसेच शुध्द हरपरे अशी लक्षणे रोग्यात जाणवत असतात.
NDND

मस्तिष्क कॅन्सरचे निदान कसे कराल?
* ब्रेन ट्यूमरवर उपचार लक्षण व परीक्षणाच्या काळात होऊ शकतो. परीक्षणानंतर विशेष प्रकारच्या चाचर्‍या कराव्या लागत असतात. डोक्याचा एक्स-रे, कॅट स्केन, मनक्यातील पाण्याचे परिक्षण यादी द्वारे या रोग्याचा निदान करू शकतात. ब्रेन ट्यूमरवर प्रारंभिक अवस्थेतच उपाचार करणे शक्य होत असते.

* शल्य चिकित्सा, रेडिओ थेरपी तसेच औषधीच्या माध्यमातून ब्रेन ट्यूमरवर आता प्रभावी उपचार केला जाऊ शकतो.

* डोके दुखीवर दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टराचा सल्ला घ्यावा. ब्रेन ट्यूमरचे लक्षणे जाणवत असल्यास त्वरीत परीक्षण करून घेणे हाच ब्रेन ट्यूमरवर प्राथमिक उपाचार आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा