उन्हाळ्यात मेकअप सांभाळा
|
उन्हाळ्यात आपला मेकअप अधिक काळ टिकण्यासाठी काही गोष्टी ध्यानात ठेवणे आवश्यक आहेत.
* उन्हाळ्यात वाटरप्रुफ मेकअपचाच प्रयोग करा.
* आपल्या चेहर्यावर आलेला घाम पुसण्यासाठी ब्लॉटिंग पेपरचा वापर करावा.
* फाऊंडेशन लावताना त्याचा चेहर्यावर पातळ थर लावा, कारण जास्त लावलेले फाऊंडेशन काढण्यासाठी कापसाच्या बोळ्याचा वापर करावा लागेल व तो काढण्यासाठी जास्त वेळही लागतो.
* उन्हाळ्यात फाऊंडेशनच्या जागी आपण टिंटेड मॉश्चराइजरचा वापर करू शकतात.
* उन्हाळ्यात संपूर्ण चेहर्याचा मेकअप करू नका. त्या ऐवजी वाटरप्रूफ मस्कारा व आय लाइनर लावूनही आपण हलका फुलका मेकअप करू शकता.
* मेकअप व आपण परिधान करणार असलेला ड्रेस मॅच होणे महत्त्वाचे आहे. जर आपला ड्रेस कूल असेल तर त्यावर मेकअप हा देखल कूलच असला पाहिजे.
* उन्हाळ्यात आपल्या नाजून ओठाचे सौंदर्य आबादीत ठेवण्यासाठी लिप बाम लावला पाहिजे.
