Britons choose good night's sleep over night of passion: Poll | दमवणार्या सेक्सपेक्षा झोप बरी!
थेट प्रश्न विचारला तर कुणी आपल्या 'पौरूषत्वावर' शंका घेतील म्हणून कुणी सांगत नाही, पण सत्य तेच आहे. होय, सर्वच पुरूषांना रात्री 'दमवून' टाकणार्या सेक्सपेक्षा छानपैकी झोप घ्यायलाच आवडते. ब्रिटनमध्ये झालेल्या सर्वेक्षणात तरी हीच बाब आढळलीय.
अनेकांच्या मते 'सेक्स' खूपच दमवणारा असतो. पण या दमण्यात त्यांना काही 'मज्जा' वाटत नाही. भलेही आर्थिक पेचप्रसंग असो, पैशांची अडचण असो किंवा नोकरी जाण्याचे भय 'सेक्स'वर कुणाचाच काहीही प्रभाव पडलेला नाही. या सगळ्यांमुळे सेक्स वाढल्याचे म्हणणे म्हणजे धादांत खोटे असल्याचे हे सर्वेक्षण सांगते.
या सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी तब्बल ८० टक्के जणांना तासंतास चालणार्या या वासनेच्या खेळापेक्षा छान नि शांत झोप महत्त्वाची वाटते.
'डेली मेल'मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीत,या सर्वेक्षणाचा तपशील दिला आहे. लोकांच्या प्रधान्यक्रमात सेक्स नसतोच. त्यांच्या दृष्टिने ती आवश्यक बाब आहे हे नक्की, पण आपल्याला करण्याच्या गोष्टींपैकी एक असेच तिचे स्थान नि स्वरूप आहे. जसे ऑफिसला जाणे, मुलांबरोबर खेळणे, स्वंयपाक करणे, शॉपिंग करणे या गोष्टींप्रमाणे 'सेक्स करणे' ही एक या विविध कामांच्या यादीतील एक 'बाब असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
सगळे पुरूष मेले सारखेच. त्यांना आपले नेहमीच 'ते' हवे असते, असे म्हणणार्या बायकोंनो, आता तरी पुरूषांना समजून घ्याल की नाही?