मुख्य पृष्ठ > विविध > आरोग्य > लेख > पोरं-टोरं सेक्समध्ये भलतीच निष्काळजी !
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
पोरं-टोरं सेक्समध्ये भलतीच निष्काळजी !
शाळा-कॉलेजातली पोरं-पोरी सेक्स करत असली तरी 'प्रेग्नन्सी' राहू नये यासाठी आवश्यक ती काळजी घेत नसल्याचे एका अभ्यासातून पुढे आले आहे. या पोराटोरांच्या सेक्समध्ये गर्भनिरोधकाचा वापर होत नसल्याने 'टिन एज प्रेग्नन्सी'चे प्रमाण वाढल्याचे या अभ्यासात म्हटले आहे.

'टिन प्रेग्नन्सी'चे प्रमाण १९९० ते २००० या काळात नक्कीच खाली आले. पण २०००३ ते २००७ या काळात मात्र हे प्रमाण पुन्हा वाढीला लागल्याचे दिसून आले, असे डॉ. जॉन एस. सांतेली यांचे निरिक्षण आहे. डॉ. सांतेली हे कोलंबिया विद्यापीठाच्या लोकसंख्या आणि कौटुंबिक आरोग्य या विभागाचे प्रमुख आहेत.

डॉ. सांतेली यांच्या मते, १९९१ ते २००३ या काळात मुलांमध्ये कंडोमचा उपयोग करण्याची जागरूकता वाढली होती. त्यामुळेच प्रेग्नन्सीलाही आळा बसला. इतकी महत्त्वाची मजल मारलेली असतानाही २००३ नंतर मात्र हे चक्र उलटे फिरले आणि कंडोम वापरण्याची जागरूकता कमी होत गेली. परिणामी टिन प्रेग्नन्सीचे प्रमाणही वाढल्याचे मत डॉ. सांतेली नोंदवतात.

'टिन एज'मधली मुले आजही सेक्स करतात, पण गर्भनिरोधासाठी आवश्यक ती काळजी मात्र घेत नाहीत. त्यातून मग अनावश्यक प्रेग्नन्सी आणि सेक्समधून पसरले जाणारे रोग बळावतात, अशी डॉ. सांतेली यांची खंत आहे. गर्भनिरोधकांचा वापर करण्यासंदर्भातील निष्काळजीपणासाठी डॉ. सांतेली एचआयव्हीच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी राबविलेल्या मोहिमेत आलेल्या अपयशाला जबाबदार धरतात.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
दमवणार्‍या सेक्सपेक्षा झोप बरी!
आपले डोळे व आहार
उन्हाळ्यात मेकअप सांभाळा
जीवघेणा ब्रेन ट्यूमर
कॉन्टॅक्ट लेन्स
फिटनेसाठी 'यौगिक डाएट'