1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य लेख

पावसाळ्यात आरोग्याची काळजी घ्या

ND
मान्सून सुरू होण्याआधीच प्रत्येक घरात आरोग्याविषयी तक्रारी सुरू झाल्याचे दिसते. त्यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच आपण आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. पावसाच्या दुषीत पाण्याने आजार पसरतात. ऐन पावसाळ्यात ऊन तापत असल्याने 'मे' हीट सदृश्य परिस्थितीने शरीराची लाहीलाही होते. त्यासाठी पावसाळ्यात खाण्यापिण्याकडे लक्ष दिले पाहिजे. त्याकरीता आपल्यासाठी काही टिप्स....
1. जास्तीत जास्त पाणी प्यायला पाहिजे.
2. कोल्ड ड्रिंकचा मोह टाळावा.
3. हलके व पौष्टिक जेवण घ्यावे.
4. या दिवसात पालक, मुळा, कांदे व लसूण खाणे टाळावे.
5. या दिवसात सुका मेवा कमी प्रमाणात खावा.
6. आपल्या जेवणात फळे, सलाड व ज्यूस यांचा सहभाग असावा.
7. बाहेरचे उघड्यावरचे तेलकट पदार्थ खाणे टाळावे.
8. लिंबू पाणी, सरबत, लस्सी मोठ्या प्रमाणात घ्यावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा