U.S. teens get sex education, but not from parents | अमेरिकन मुलं सेक्समध्ये ''ढ''
जगाला ज्ञानामृत पाजणार्या अमेरिकेतली मुलं सेक्सच्या मात्र बाबतीत अगदीच 'ढ' आहेत. या बाबतीतलं धड ज्ञान न घेताच 'विषयाला' हात घालण्याच्या घाईमुळे यासंदर्भातले अनेक धोके तिथे वाढत आहेत. त्यांचे पालकही त्यांना याविषयी ज्ञान देण्यात अपुरे पडत असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे.
असुरक्षित संभोग केल्याने होणारे रोग मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असून एचआयव्हीची लागण झालेल्या १५ ते १९ वयोगटातील मुलांच्या संख्येत गेल्या दहा वर्षात दुपटीने वाढ झाल्याची धक्कादायक बाब लक्षात आली आहे. त्यामुळेच अमेरिकेतल्या मुलांना आता योग्य लैंगिक शिक्षण देण्याची वेळ आली आहे, असे सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनचे (सीडीसी) म्हणणे आहे.
या संस्थेने जाहिर केलेल्या अहवालातील अनेक बाबी गंभीर नि धक्कादायक आहेत.
१. १८-१९ वर्षे वयाच्या ४९.८ टक्के मुली आणि फक्त ३५ टक्के मुले गर्भनियंत्रण या विषयावर पालकांशी बोलतात.
२. 'सेक्स'ला नाही कसे म्हणावे याची माहिती वयाच्या १८ व्या वर्षाआधीच मिळाली, असे ८० टक्के मुला-मुलींनी सांगितले.
३. १५ ते १७ या वयोगटातील तीस टक्के मुलींनी सेक्स केलेला आहे. १८ ते १९ या वयोगटात हेच प्रमाण ७० टक्क्यांपर्यंत गेले आहे.
४. १५ ते १७ वयोगटातील ३१.६ टक्के मुले सेक्सचा अनुभव घेतता. १८ ते १९ या वयोगटात हेच प्रमाण ६४.७ टक्क्यांपर्यंत जाते.
५. १८ ते २४ या वयोगटातील जेमतेम दहा टक्के तरूणी अनिच्छेने पहिल्यांदाच सेक्स करतात.
६. १९९७ मध्ये १५ ते १९ या वयोगटातील मुलांमध्ये एचआयव्हीच्या लागणीचे प्रमाण दर एक लाखामध्ये १.३ टक्के एवढे होते. ते २००६ मध्ये २.५ टक्के एवढे झाले आहे. मुलींमध्ये हेच प्रमाण १.५ टक्के होते ते आता २.२ टक्के झाले आहे.