Adult toys sell like hot cakes in recession-hit Britain | मंदीतही सेक्स शॉप्स मात्र तेजीत!
PR
PRया दुकानात सेक्स टॉईज मिळतात. म्हणजे लैंगिक खेळणी. जोडीदाराव्यतिरिक्त किंवा जोडिदारासह 'सेक्स' करण्यासाठी ही खेळणी उपयोगी पडतात म्हणे. अशी शॉप्स रंगेल नगरी पॅरीसमध्येही भरपूर आहेत. पण लंडनचे हे शॉप खास महिलांसाठीच आहे. इंग्लंडमध्ये या खेळण्यांचे मार्केट तब्बल २५० दशलक्ष पौंडांचे आहे, असा ह्यूसन ग्रुप या विश्लेषक कंपनीचा अंदाज आहे.
बाहेर मंदी असली तरी आमच्या दुकानात मात्र एका तासात तीनशे ते पाचशे पौंड खर्च करून टाकणारे ग्राहक अगदी नियमित येतात, असे Sh! च्या व्यवस्थापक रिनी डेनयर सांगतात तेव्हा आश्चर्य वाटते. या दुकानात पुरूषांशी संबंध ठेवणार्या स्त्रियांपासून ते अगदी लेस्बियन, बायसेक्श्युअल अशा सर्व प्रकारच्या महिला येतात. या सगळ्यांची 'गरज' भागवतील, अशी 'खेळणी' येथे आहेत.
या दुकानात येणार्या ग्राहकांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना त्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. सेक्स डिव्हीडी, अंतर्वस्त्रे, खेळणी, नियतकालिके यासह सेक्सशी संबंधित कोणत्या वस्तू ग्राहकांना हव्या आहेत याची माहिती ही मंडळी ग्राहकांना देतात.
या दुकानात येणारी मंडळी १८ ते ८२ या वयोगटातील आहेत. हे दुकान महिलांसाठी असले तरी महिलांसबरोबर पुरूषही या दुकानात येऊ शकतात. एकट्या पुरूषांना दुकानात येण्यास घातलेली बंदी सकारात्मक असल्याचे व्यवस्थापिक डेनयर यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्या मुक्तपणे आणि कोणत्याही दडपणाविना खरेदी करू शकतात. समाजातील प्रत्येक वर्गातील लोक इथे यावेत अशी आमची अपेक्षा आहे. म्हणूनच दुकानात तरूण, मध्यमवयीन पुरूष आणि स्त्रिया तसेच ज्येष्ठ नागरिकही येताना दिसतात. एका सत्तरीच्या महिलेला विचारले तेव्हा तिच्या इथे येण्याचं गूढ उकलंलं. चार दशकांचं वैवाहिक आयुष्य भोगलेल्या त्या महिलेचा पती चार वर्षांपूर्वी गेला. त्यानंतर एकट्या पडलेल्या या महिलेने सेक्स टॉईजचा वापर करून या वयातही सेक्स फुलवला आहे.
पूर्वी अशी सेक्स शॉप्स लंडनच्या वेस्ट एंड भागात चिंचोळ्या गल्लीत आढळायची. तिथे 'या' विषयातलं सगळं 'सुख' मिळायचं. पण आता काळ बदलला तसा या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला आहे. म्हणूनच चिंचोळ्या गल्लीतली ही दुकानं आता मुख्य रस्त्यावर आली असून अगदी कपड्यांच्या किंवा डिपार्टमेंटल स्टोअर्सच्या रांगेत ती व्यवसाय करताहेत.
सेक्स शॉपमध्ये गर्दी होण्याची कारणं काय हेही शोधून काढण्याचा प्रयत्न झालाय. अर्थात,याची उत्तरही अपेक्षित अशीच आलीत. यामुळे म्हणे सेक्समधली उत्तेजकता वाढते. त्यामुळेच २०१४ पर्यंत सेक्स टॉईजचे मार्केट एक अब्ज पौंडांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. ज्या महिलांना ऑर्गेझम मिळत नाही त्या महिलांना ही खेळणी वापरण्यास हरकत नाही, असे ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसने सांगितल्यानंतर तर हे मार्केट चांगलेच विस्तारले आहे. त्यामुळेच वापरलेली खेळणी न धूता इतरांना देऊ नका वा वापरू नका असा इशाराही एनएचएसला द्यावा लागला आहे.
