1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य लेख

फळंही झाले ग्लोबलाईज!

फळंही झाले ग्लोबलाईज
ND
ND
ग्लोबलायजेशनच्या युगात आता फळेही ग्लोबलाईज झाली आहेत. महानगराच्या पाठोपाठ आता लहान- मोठ्या शहरातही परदेशातील फळे सहज उपलब्ध होऊ लागली आहेत. एवढेच नव्हे तर परदेशातील फळे आता फेरीवाल्यांकडे ही दिसू लागली आहेत.

पुर्वी ऋतुनुसार आपल्याला फळे ‍मिळत होती, परंतु विज्ञानाच्या जोरावर आता आपल्याला प्रत्येक ऋतूत फळे घेता येतात. अमेरिकेचे सेब असो किंवा इस्त्राईलची संत्री तर आफ्रिकाचं बब्बूगोशा आदी फळे मोठ्या मॉलमध्ये सवलतीच्या दरात सहज उपलब्ध होऊ लागली आहेत. थायलंडच्या लीचीलाही भारतात मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

* आंबा- फळांचा राजा असलेला आंबा तर आता प्रत्येक ऋतुमध्ये बाजारात उपलब्ध होत असतो. कोकणात आंब्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. आंब्याच्या जातीमध्ये तेथे संशोधन होत असून आता बाराही महिने झाडाला आंबा येत आहे. कोकणातील आंबा परदेशातही मोठ्या प्रमाणात निर्यात केला जातो. तर थायलंडहून भारतात आंब्याची आयात केली जाते. त्याची लोकप्रियता अलिकडच्या काळात खूप वाढली आहे.

* सफरचंद- आरोग्यास उत्तम असणारे फळ म्हणून सफरचंदकडे पाहिले जाते. भारता पाठोपाठ दक्षिण आफ्रिका, न्युजीलंड व अमेरिकेचे सफरचंद प्रसिद्ध आहे. आता चीनचेही सफरचंद बाजारात आले आहे.
ND
ND


* नाशपती- आता नाशपती हे फळ देखील बाराही महिने बाजारात उपलब्ध होत असते. अमेरिकन नाशपती सध्या भारतात मोठ्‍याप्रमाणात येत आहेत.

परदेशातून भारतात आयात करण्यात येणार्‍या फळांच्या किंमती देशी फळांच्या तुलनेत जास्त असते. फळे आपल्या आरोग्यासाठी उत्तम असल्याने ते खरेदी करताना देशी आहेत क‍ि परदेशी, याकडे मात्र कोणाचे लक्ष नसते.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा