Smoking, Sigarat, Tobaco, Cancer, Arogya, Heath | स्मोकिंग इज नॉट एलाऊड
WD
वॉशिंग्टनमधील वृत्त तर स्मोकिंग करणार्यांसाठी धक्कादायकच आहे. तेथे भाड्याच्या घरात धुम्रपान करण्यास घरमालकांनी पाबंदी घातली आहे. अमेरिकेत रेस्टोरेंट, कार्यालय, सार्वजनिक स्थळे, क्लब व बियरबारमध्ये स्मोकिंग करण्यावर निर्बंध घातले आहे. भविष्यात धुम्रपान करणार्यांची मोठी गोची होणार आहे. त्यांना धुम्रपान करण्यासाठी वारंवार दंड भरावा लागले किंवा सिगारेट ओढणे तरी बंद करावे लागणार आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार तंबाखू तसेच तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणार्यांना हृदयविकार, कॅन्सस व इम्फेसिमा सारखे भयानक आजार होऊ शकतो. संयुक्त राष्ट्राच्या 19 राज्यांमधील सुमारे 2300 शहरात सिगारेट ओढणार्याविरूध्द कायदा लागू करण्यात आला आहे. त्यात न्यूयॉर्क, लॉस एंजिल्स, शिकागो व वॉशिंग्टन आदी मोठी शहरे सहभागी झाली आहे. भारतातही सार्वजनिक ठिकाणी सिगरेट ओढणार्या व्यक्तीविरूध्द कठीण कायद्याची अमंलबजावणी केली जात आहे.
एवढे असून देखील तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणार्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. भारतात 25 कोटी लोक सिगरेट किंवा तंबाखू सेवन करतात. ही धक्कादायक माहिती आरोग्य मंत्रालयातून उपलब्ध झाली आहे. वयाच्या 30 ते 40 वर्षात हार्ट अटॅक येण्यामागे सिगरेट ओढणे, हे सगळ्यात मोठे कारण असल्याचे कॅन्सर रोग तज्ज्ञांनी म्हटले आहे.
इंडियन मेडिकल काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च सेंटरनुसार भारतात प्रतिवर्ष 10 लाख लोक तंबाखूच्या सेवनाने मरतात. अर्थात प्रतिदिन जवळपास 3000 नागरिकांचा मृत्यु होतो. स्मोकिंग सोडण्यासाठी काही लोक काऊंसिलिंग, निकोटिन रिप्लेसमेंट थेरपी व औषधांचा करत असतात. मात्र ते व्यसनाच्या इतक्या आहारी गेले असतात की, त्यातून त्यांना बाहेर निघणे अशक्य झाले असते. काही नागरिक सिगारेट सोडायची म्हणजे सोडायचीच अशी मानसिकता करून तिच्यावर नियंत्रण मिळवत असतात. सिगारेट सोडण्यासाठी मनाशी ठाम निश्चय केला पाहिजे, व्यसन सोडण्यासाठी तिच एकमेव उपचार पध्दती म्हणता येईल.
