आरोग्य सल्ला | घरचा वैद्य | अडगुलं मडगुलं | लेख | स्वाइन फ्लू
मुख्य पृष्ठ » विविध » आरोग्य » लेख » मासिक पाळीच्या वेदना आता विसरा! (Drug developed to end women's monthly misery!)
Feedback Print Bookmark and Share
 
महिलांना दर महिन्याला भोगाव्या लागणार्‍या मासिक पाळीच्या वेदनांतून सुटका मिळण्याचा क्षण आता जवळ आला आहे. शास्त्रज्ञांनी अशी एक गोळी तयार केली आहे, जी या वेदनांमधून जगातील कोट्यवधी महिलांची सुटका करू शकेल.

ब्रिटिश शास्त्रज्ञांच्या गटाने व्हीए १११९१३ या नावाची ही गोळी तयार केली असून त्यामुळे मासिक पाळीच्या काळात होणारी वेदना नाहीशी होईल. अनेक महिलांमध्ये पाळीची नुसती लक्षणे दिसून आली की पोट दुखायला सुरवात होते. पण या गोळीमुळे पोटदुखीच्या मूळ कारणावरच इलाज केला जाईल.

मासिक पाळीच्या काळात गर्भपिशवी आकुंचन पावते. शास्त्रज्ञांनी हे आकुंचन रोखण्यासाठीच प्रयत्न केले आहेत. व्हॅसोप्रेसिन नावाचे हार्मोन गर्भाशय आकुंचन पावणार्‍या स्नायूंवर प्रभावशाली ठरते. या हार्मोन्सवर परिणाम करू शकेल अशी या गोळीची क्षमता आहे. या गोळीमुळे या हार्मोन्सवर परिणाम घडवून ते त्याच्या नियमित पातळीला आणून ठेवण्यात येईल. परिणामी गर्भाशय आकुंचन पावून त्यामुळे पोटदुखी होणार नाही.

मासिक पाळीच्या काळात पोटदुखीमुळे अनेक महिला बेजार असतात. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सध्या तरी कोणतीही उपचार व्यवस्था नाही. त्यामुळे ही नवी गोळी त्यांच्यासाठी आशेचा किरण ठरू शकते, असे या संशोधनात काम करणारे डॉ. जिम फिलिप्स यांनी सांगितले.

ही गोळी सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले असून त्याचे साईड इफेक्टसही फार कमी आहेत. त्याच्या आतापर्यंत घेतलेल्या चाचण्या यशस्वी झाल्या असून पुढच्या चार वर्षांत ही गोळी दुकानात मिळायला सुरवात होईल.
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: मासिक पाळी