super child | आता जन्माला घाला ''सुपर चाईल्ड'' !
ND
NDविश्व कल्याण संस्था असे या संस्थेचे नाव असून प्राचीन भारतीय ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांची सांगड घालून 'सुपर चाईल्ड' जन्माला घालण्याचे तंत्र (?) या संस्थेने विकसित केले आहे. आपल्या या उपक्रमाला 'सुपर चाईल्ड युनिव्हर्सिटी' असे नावही दिले आहे.
हल्लीच्या काळात मूल जन्माला आल्यानंतर त्यांना शिक्षण दिले जाते. पण आमच्या विद्यापीठात मात्र नवपरिणित दाम्पत्यालाच विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. त्यातूनच सुपर चाईल्ड जन्माला येते, असा दावा या संस्थेचे संस्थापक प्रल्हाद पटेल यांनी केला. आमच्याकडे अनेक नवविवाहित दाम्पत्ये यासाठी येत आहेत, असेही पटेल यांचे म्हणणे आहे.
अद्वितीय, अलौकिक व्यक्तिमत्वाचे मूल हे जन्माला घालता येऊ शकते यावर माझा ठाम विश्वास आहे. फक्त त्यासाठी दाम्पत्याची आतून इच्छा असली पाहिजे. मी त्यासाठी चरक सिंहिता, सुश्रुत संहिता, अस्तांग ह्रदय आणि इतर आयुर्वेदिक पुस्तकांचा तसेच जेनेटिक सायन्सच्या पुस्तकांचाही अभ्यास केला. त्यावरूनच मी ही संस्था उभारली असे पटेल म्हणतात.
