1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य लेख
  6. आता इंजेक्शन घ्या नि साधा स्तनवृद्धी!

£500-‘Breastox’ lifts bust in just 30 minutes! | आता इंजेक्शन घ्या नि साधा स्तनवृद्धी!

IFM
IFM
स्तनवृद्धीची आकांक्षा असणार्‍या महिलांसाठी खुशखबर आहे. स्तनवृद्धीसाठी आता दीर्घकाळ चालणारी कोणतीही ट्रिटमेंट घेण्याची आता गरज नाही. इंजेक्शन घेऊन अर्धा तासात स्तनांचा आकार वाढविण्याची ब्रेस्टॉक्स उपचार पद्धती पुढे आली आहे.

कॉस्मेटिक सर्जरी ग्रुप ट्रान्सफॉर्म क्लिनिक या वैद्यकिय व्यावसायिक संस्थेतर्फे या उपचारांना सुरवात झाली आहे. त्यासाठी आधी भूल देणारे क्रीम स्तनाभोवती लावले जाते. त्यानंतर छातीतील छोट्या नसांमधून बारा इंजेक्शन दिली जातात. त्यामुळे स्तनांच्या आकारात वाढ होते आणि लोंबकळणारे स्तन मऊ पण ताठर होतात. पण अर्थात, हा परिणाम कायम रहाण्यासाठी दर सहा महिन्यांनी या प्रक्रियेच्या पुनरावृत्तीचीही गरज आहे. त्यामुळेच लग्नासारख्या काही विशेष समारंभांसाठी आपले स्तन मोठे दिसावेत, अशी आकांक्षा असणार्‍या मुलींसाठी ही सुवर्णसंधी आहे.

ज्या महिलांनी ही ट्रिटमेंट स्वतःवर करवून घेतली, त्यांचा यासंदर्भातील अनुभवही चांगला आहे. स्तनांची त्वचा मऊ झाली आणि स्तनही ताठर झाल्याचा अनुभव आल्याचे महिलांनी सांगितले. शस्त्रक्रिया करण्यापेक्षा इंजेक्शनची उपचार पद्धती चांगली असे त्यांचे मत पडले.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा