स्तनाचा कर्करोग- लक्षणे व उपचार
PR
PRलक्षणे-
1. स्तनात गाठ.
2. बोंडातून द्राव येणे.
3. आत वळलेले बोंड.
4. बोंड लाल होऊन वेदना होणे.
5. अचानक स्तनाचा आकार वाढणे.
6. अचानक स्तन आकुंचन पावणे.
7. स्तन घट्ट होणे.
8. स्नायूंच्या वेदना, पाठ दुखी
स्तनाच्या कर्करोगाला कौटुंबिक इतिहास असतो. आपल्या निकटच्या नातेवाईकाला झाला असल्यास त्याच्याकडून तो पसरण्याची भीती नाकारता येत नाही. महिलांचे वय वाढते तसा धोकाही वाढत असतो. गर्भाशयाचा कर्करोग व स्तनाचा कर्करोग यांचा जवळचा संबंध असतो. वयाच्या 12 व्या वर्षाच्या आधी मासिक पाळी सुरु होणे, वयाच्या 50 वर्षानंतर रजोनिवृत्ती संपणे, मूल झालेले नसणे तसेच मद्यपान, अधिक चरबीयुक्त आहार, चोथायुक्त अधिक आहार, धूम्रपान, लठ्ठपणा आणि आधी गर्भाशयाचा किंवा कोलोनचा कर्करोग झालेला असणे, अशा महिलांना स्तनाचा कर्करोग होण्याचा अधिक धोका असतो.
PR
PRउपचार-
स्तनाच्या कर्करोगाचा उपचार तीन मुख्य घटकांवर आधारित असतो-
1. जर ती स्त्री रजोनिवृत्तीला पोचली असेल
2. कर्करोग किती पसरला आहे
3. कर्करोगाच्या पेशीचा प्रकार
स्तनाच्या कर्करोगावर उपचार करण्यापूर्वी कर्करोगाच्या प्रसाराचे प्रमाण निश्चित करणे आवश्यक ठरत असते.
1. स्तनात तो कुठे झाला आहे.
2. कर्करोग ज्या वेगाने गाठींपर्यंत पोहचला आहे.
3. कर्करोग स्तनातील खोलवरच्या स्नायूंमध्ये किती पसरला आहे.
4. हा कर्करोग दुसर्या स्तनात पसरला आहे का ते पहाणे.
5. हा कर्करोग इतर अवयव, जसे, हाडे किंवा मेंदूत पसरला आहे का ते पहाणे.
स्तनाच्या कर्करोगाचे पेशीच्या प्रकारानुसार, पेशींचे अधिक क्रियाशील आणि कमी क्रियाशील असे प्रकार आहेत. त्याशिवाय, या पेशींवरच ग्राहक असतात जे स्तनाच्या कर्करोगाला उपचारांना अधिक प्रतिसाद देण्यास सक्षम करतात.
वरील मुद्यांचा आधार डॉक्टर उपचार करतात घेत असतात.
स्तनाच्या कर्करोगाचा महिलेवर उपचार करताना स्तनातील गाठ आणि त्याभोवतीची उती किरणोत्सार किंवा त्याविना काढणे, संपूर्ण स्तन काढून टाकला जातो.
महिलांनी दर महिन्यात स्तनांची स्वतः तपासणी करावी. आपल्याला स्तनाचा कर्करोग आहे असा संशय असल्यास, तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास तो बरा करता येतो परंतु निदान आणि उपचार लांबल्यास मृत्यु येऊ शकतो
