लठ्ठ मुलांना मधुमेहची शक्यता जास्त असते
अठराव्या वर्षीच लठ्ठ असणाऱ्या मुलांना आयुष्याच्या अर्ध्या वाटेवरच मधुमेह गाठण्याची शक्यता निम्मी म्हणजे 50.1 टक्के आहे. लठ्ठ मुलींसाठी तर ही बाब आणखी चिंतेची आहे. कारण त्यांच्यात या वयात लठ्ठपणा असल्यास त्यांना पुढच्या आयुष्यात मधुमेह होण्याची शक्यता मुलांपेक्षा जास्त म्हणजे 57.3 टक्के आहे.
