ह्रदयविकाराचा धोका टाळण्यासाठी रोज बिया असलेली फळे खा. रोज मुठभर जरी अशी फळे खाल्ली तरी हा धोका नक्की कमी होईल.
शास्त्रज्ञांच्या संशोधनात ही बाब आढळली आहे. त्यांच्या मते रासबेरी, जांभळे नियमितपणे खाल्ल्यास रक्तदाब व कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित राखता येते. रक्ताच्या गाठी बनण्याची प्रक्रियाही यामुळे थांबते. फिनलंडमध्ये हेलसिंकीतील स्वयंसेवकांच्या एका गटाने दोन महिने रोज बिया असलेली फळे खाल्ली. त्यानंतर त्यांची शारीरिक चाचणी घेतली असता त्यांच्यातील कोलेस्ट्रॉलचे व रक्तदाबाचे प्रमाण सुधारल्याचे लक्षात आले.
|