छोटासा अपघात होऊन थोडसं लागलंय किंवा खरचटलं असेल तर केवळ किरकोळ म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण अशा किरकोळ दुखापती जीवघेण्या ठरू शकतात.
स्पेनमध्ये सुटी घालविण्यासाठी गेलेल्या अठरा वर्षीय मॅथ्यूबाबत असेच घडले. त्याच्या बोटाला खरचटले होते. पण नंतर चार महिन्यांनी त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या मते त्याला प्लास्टिक नॅमिया नावाचा रोग झाला होता.
हा रोग अडीच लाखांत एकाला होऊ शकतो. केवळ पाच मिलीमीटर खरचटल्यामुळे मॅथ्यूच्या पूर्ण हातावर या रोगाचा संसर्ग झाला. आजाराने गंभीर स्वरूप घेतल्यावर त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तपासणीत त्याला बोन मॅरो ट्रान्सप्लांट करण्याची गरज असल्याचे लक्षात आले. पण ऑपरेशन होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. एवढ्या किरकोळ दुखापतीमुळे आपल्या मुलाचा मृत्यू झालाय, यावर त्याच्या वडिलांचा विश्वासच बसत नाहीये.
|