1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य सल्ला

दातांच्या तक्रारी

दातांच्या तक्रारी
ND
दात हालणे, किडणे, दात दुखणे, दाताला गळू येणे, हिरडीला सूज येणे इत्यादी दातांच्या तक्रारी आहेत.

हाडे चांगली असतील तर दात चांगले येतात. त्यामुळे गरोदरपणीही आईने अस्थिपोषक आहार ठेवावा. बाळंतपणातही खारीक, खोबरे चावून चावून खावे. त्याने हिरड्या बळकट होतात.

खालील आहारांमुळे दात चांगले राहण्यात मदत होते.

आवळा, आवळकाठी चावून चावून खावी. त्यातील व्हिटॅमिन सी हे उत्तम औषध आहे. आवळकाठी रोज चावली तर पायोरिया बरा होतो.

लिंबाचा रस - जेवण झाल्यानंतर लिंबू व मीठ दातांना चोळायची सवय फार चांगली. त्याने हिरड्या बळकट होऊन दातांना चमक येते.

पुदिना - पुदिन्याची चटणी, कच्चा कांदा चावून चावून खाल्ल्यास दाताच्या तक्रारी कमी होतात.

दही, चेरीचा रस तसेच पेरू खावा. पूर्वी आपल्याकडे बाभळीच्या किंवा कडुलिंबाच्या काड्यांनी दात घासण्याची पद्धत होती. त्यामुळे दाताच्या फटीतले अन्नकण निघून येतात. त्याच्या तुरटपणामुळे लाळ भरपूर सुटते व हिरड्या बळकट होतात. व्हिटॅमिन सी ने दात व हिरड्या चांगले होतात.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा