घरच्या घरी वैद्य व्हा !
|
मोरावळा - पितं झाले असल्यास चमचाभर मोरावळा घेऊन त्यात कामदुधा मात्रा हरभर्याएवढी घालून खावा. पित्त लगेच कमी होते.
बेलफळाचा मोरंबा - दररोज एक चमचा खाल्ल्यास शक्तिवर्धक, पित्तनाशक आहे. आव पडत असल्यास खावा.
लवंगतेल - दाढ सुजणे, दाढ दुखणे, हिरड्या सुजणे यावर कापसाच्या बोळ्यावर तेलाचे 2/3 थेंब टाकून हा बोळा दाढेत धरावा. दाढ दुखायची थांबते. थंडीने हातपाय दुखत असल्यास लवंगतेल खोबरेल तेलात मिसळून लावावे.
जायफळ - गोड पदार्थात स्वाद येण्यासाठी घालतात. तूप वास न येता टिकावे म्हणून तुपात टाकतात. रात्री झोप न आल्यास दुधात जायफळ चिंचोक्या एवढे उगाळून प्यावे. झोप लागते.
वेखंड पूड - घराच्या दारात वेखंड पूड पसरली तर उग्र वासाने विंचू-सर्प येत नाहीत. थंडीने कपाळ दुखत असल्यास वेखंड उगाळून लावावे. अगर त्याची पूड लावावी. ताप उतरल्यावर अंघोळ केल्यास अंग कोरडे करून वेखंडपूड अंगाला लावावी म्हणजे थंडीवार्याचा त्रास होत नाही. लहान मुलांना दररोज अंघोळीनंतर वेखंड लावावे. सर्दी होत नाही.
काळी माती - स्वयंपाक वगैरे करताना तेल अंगावर उडाले, हात किंवा पाय भाजला तर लगेच मातीत पाणी घालून राहा करून त्यात चमचाभर मीठ घालून ही राड भाजलेल्या जागी लावल्यास फोड येत नाही. आग कमी होते.
ओवा - पोटात मुरडा होऊन कळ येत असेल तर ओवा चमचाभर घेऊन त्यात थोडे मीठ घालून गरम पाण्याबरोबर प्यावे. पोटात दुखायचे थांबते. तान्ह्या बाळाचे पोट दुखत असेल तर ओवा पूड खाऊन बेंबीवर व तोंडात फुंकर मारावी. भजी करताना त्यात ओवा पूड घालावी. कफ सुटतो, ओकारी थांबते, आव थांबते.
