मुख्य पृष्ठ > विविध > आरोग्य > सल्ला
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
बलबुद्धिवर्धक बदाम  Search similar articles

badam
ND
बल-बुद्धी वाढीसाठी बदाम कसा सेवन करावा ते उपाय दिले आहेत :-

* रात्री झोपताना बदामाचे तेल डोक्याला लावावे यामुळे शांत झोप येते. निद्रानाशामुळे स्मरणशक्ती कमी होत असल्यास हा उपाय निश्चितपणे करावा.

* रात्री दोन बदाम पाण्यात भिजवून ठेवावेत. सकाळी उठल्यावर तोंड धुऊन उपाशीपोटी बदाम खावे किंवा एक ग्लास दुधाबरोबर सेवन करावे.

* बदाम, खसखस व खडीसाखर सोबत वाटून त्याचा शिरा करून द्यावा.

* लहान बाळ खूप अशक्त असेल तर संपूर्ण अंगाला बदामच्या तेलाने मालीश करावी. यामुळे बाळ सुदृढ होते. याशिवाय बदामाचे तेल केसवृद्धीसाठी वापरतात.

* बदामाच्या फळाची भाजी करतात. ही आंबट-गोड भाजी हाडांसाठी चांगली असते. हे टरफल वाळले असता भाजून त्याची राख करावी. दंतमंजन म्हणून त्याचा वापर केल्यास दात मजबूत होतात.

* बाळंतिणीला दूध कमी येत असेल तर बदाम व खसखसचा शिरा खायला द्यावा. वरून दूध प्यावयास द्यावे. यामुळे स्तन्यवृद्धी होते. याशिवाय बदाम पांढरे पाणी, सकष्ट मूत्रप्रवृती इत्यादी विकारांमध्ये फायद्याचे आहे.

बदामाचे इतके फायदे बघितल्यावर या थंडीमध्ये निश्चित त्याचा वापर मुलांसाठी करा. लहान मुलांना बदाम पाक, बदामाचा शिरा, बदामाचे दूध किंवा बदामबर्फी करून घाला. मग बघा मुलांची बुद्धी वाढते आणि तब्येतही सुधारेल.
आणखी
घरच्या घरी वैद्य व्हा !
संग्रही असू द्या !
सतत आनंदी राहण्यासाठी
ताप, अंगदुखी विकार असल्यास
दम्यावरील पथ्थ्याचे पदार्थ
जर मुलं अंगठा चोखत असतील तर....