निरोगी रहाण्याचे नियम
|
* प्रातःकाळी सूर्योदयाच्या आधी उठावे.
* नियमित व्यायाम, मॉर्निंग वॉक व योगासने करणे लाभदायक आहे.
* सकाळची कामे नियमित व वेळेवर केली पाहिजेत.
* दररोज अंघोळ केल्याने तन व मन स्वस्थ राहते.
* पौष्टिक व संतुलित आहार घ्यावा.
* दररोजच्या आहारात फळे व हिरव्या पालेभाज्या हव्यात.
* दोन वेळच्या जेवणात साधारण सात ते आठ तासांचा अवधी ठेवला पाहिजे.
* जेवण केल्यानंतर दोन तासांनी झोपावे.
* दररोज 10 ते 12 ग्लास पाणी सेवन केले पाहिजे.
* जास्त क्षारयुक्त व शर्करायुक्त पदार्थांचे सेवन टाळावे.
* धूम्रपान, दारू, चटपटीत पदार्थ व 'फास्टफूड' यांच्यापासून दूर राहा.
* आठवड्यातून एक दिवस उपवास ठेवावा. त्याने पचनक्रियेस आराम मिळतो.
* आपल्या दिनचर्येत शारीरिक श्रम असावेत, त्याने उच्च रक्तदाब, मधुमेह, एसिडिटी, अनिद्रा, कॅन्सर व हृदयरोगापासून स्वत:ला वाचवू शकाल. कामाच्या व्यापातून आपल्या परिवारासाठी वेळ काढावा.
* कामासोबत शरीराला आरामाची देखील गरज असते. पुरेपूर झोप घ्या. रात्री आठ ते दहा तास झोप आवश्यक आहे.
* नियमित शरीराची तपासणी करून डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
|
* व्यायाम, काम व आराम यांच्यात समन्वय साधावा.
* 'जीवन' ही परमेश्वराने दिलेली एक देणगी आहे. प्रातःकाळी परमेश्वराचे मनापासून स्मरण, चिंतन करा.
* मनात नेहमी सकारात्मक विचार आणा.
* प्रसन्नचित्त राहणे हा मानवाचा जन्मसिद्ध हक्क आहे.
* दिवास्वप्न आत्मविश्वास वाढवतात.
* फावल्या वेळात सुमधुर संगीत ऐका.
* रडणे हे देखील आरोग्यवर्धक टॉनिक आहे. रडण्याने मन मोकळे होते.
