गर्भवतींनो, ताण दूर करण्यासाठी संगीत ऐका
गर्भवती महिलांमधील मानसिक ताण दूर करण्यासाठी संगीत उपयुक्त ठरू शकते, असे एका अध्ययनातून आढळले आहे. जर्नल ऑफ क्लिनिकल नर्सिंगच्या अंकात याविषयीची या अध्ययनाची माहिती प्रसिद्ध झाली आहे.
तैवानमधील काओझियुंग वैद्यकिय विद्यापीठातील नर्सिंग कॉलेजमध्ये यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. त्यासाठी एका संगीत गटात ११६ गर्भवती महिला तर दुसर्या गटात १२० महिलांचा समावेश करण्यात आला. संगीत गटातील महिलांना संगीत ऐकविण्यात आले. त्यानंतर विविध पद्धतीने त्यांच्या ताणाचा अभ्यास करण्यात आला. त्यावरून असे आढळले की दोनच आठवड्यात या महिलांचा ताण-तणाव, चिंता आणि नैराश्य यांचे प्रमाण बर्यापैकी कमी झाले होते. त्या तुलनेत दुसर्या गटातील महिलांचा तणाव फारसा कमी झाला नव्हता. चिंता व नैराश्याचे प्रमाणही जवळपास तेच राहिले.
संगीत गटातील महिलांनी संगीत ऐकताना आपली वैयक्तिक आवडही व्यक्त केली. त्यानुसार नैसर्गिक आवाजाचे संगीत महिलांना लोकप्रिय संगीतापेक्षा जास्त आवडल्याचे लक्षात आले. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या महिलांचे सरासरी वय ३० होते. आणि त्यांच्या गर्भारपणाच्या १८ ते ३४ आठवड्यांदरम्यान होत्या.