आरोग्यवर्धक सुंठ-आले
|
* जेवणाआधी आल्याच्या बारीक चकत्या करून त्यावर काळे मीठ टाकून चावून-चावून खावे. त्यानंतर साधारण 15 ते 20 मिनिटांनी जेवण करावे. तसे केल्याने पचनक्रिया उत्तम रितीने होते, पोट हलके होते व भूकही वाढते.
* आल्याचा छोटा तुकडा भाजून हळू हळू चावून खाल्ल्याने घशात जमा झालेले पित्त बाहेर पडते व सर्दी-खोकल्यापासून आराम पडतो.
* सुंठ पाण्यात उगाळवून त्यात गूळ व 5-6 थेंब तूप टाकून गरम करून लहान बालकांना दिल्याने त्यांचे जुलाब थांबतात. जुलाब जर जास्त प्रमाणात असतील तर त्यात जायफळ उगाळावे.
* आल्याचा तुकडा तोंडात ठेवून चघळल्याने उचकी बंद होते.
