1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य सल्ला

आरोग्यवर्धक मोहरी

NDND
मोहरी दोन प्रकारच्या असतात. आपल्याकडे म्हणजेच महाराष्ट्रात मिळणारी तांबूस- भुरकट व लहान असते तर पंजाब उत्तर प्रदेशात मिळणारी मोहरी तांबूस-काळपट व मोठी असते. तिला 'सरसू' या नावाने ओळखले जाते. मोहरी अधिक उष्ण असते. टॉन्सिल्स किंवा गळ्याच्या आजारावर मोहरीचा काढा घेतला जातो. मोहरी प्रत्येक घरात असतेच. कारण बर्‍याच आजारांवर तिचा औषधी उपयोगही होतो.

दात दुखत असतील तर मोहरीचा काढा तयार करून त्याच्या गुळण्या कराव्यात. शरीरावर झालेला एखादा फोड पिकत नसेल तर मोहरीचे चूर्ण तयार करून त्याचा लेप त्यावर लावल्याने आराम पडतो. संधीवाताला सरसोचे तेल फार गुणकारी आहे. लकवा, कंबरदुखी आणि काही दिवसांपूर्वी धुमाकूळ घालून गेलेल्या चिकुनगुनियाच्या रूग्णांच्या हातापायांना सरसुच्या तेलाने मालिश करावी. तसेच सर्वांला अंगाला खाज येत असेल, कुष्ठरोग झाला असेल किंवा घाम येत नसेल तर मोहरी म्हणजेच सरसुचे तेल लावावे.

बाळंतीण बायकांची देखील सरसुच्या तेलाने मालिश करतात. कारण ते अधिक उष्ण असल्याने वाताचे शमन करते. थंडीच्या दिवसात लहान मुलांची सरसुच्या तेलाने झोपण्याआधी दररोज मालिश करावी. याने शरीरात ऊब निर्माण होऊन सांधे, हाडं मजबूत होतात. मोहरीमुळे पोटात आग पडल्यास ती शमवण्यासाठी दूध, तुप, केळी असे पदार्थ खावेत. आपल्या दररोजच्या आहारात जिरे व मोहरी थोड्याफार प्रमाणात वापर करावा. याने पचनक्रिया सुधारून पोटाचे विकार दूर होतात.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा