1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य सल्ला

औषधी दुधी भोपळा

NDND
दुधी भोपळा म्हटले म्हणजे अनेक जण नाके मुरडतात. मात्र तो किती गुणकारी आहे, याबद्दल तुम्हाला कदाचित माहीत नसावी. दुधी भोपळा औषधी भाजी असून त्यात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस व अन्य खनिजे आहेत. तंतुमय, रेषादार तसेच जीवनसत्त्व 'क' असलेली फळभाजी दुर्लक्षित आहेत. मात्र, आता हळूहळू त्यांचे महत्त्व नागरिकांना पटत असल्याने ते खाण्याचे प्रमाण वाढले आहे.

* हृदयविकाराच्या रूग्णांना दुधी भोपळ्याचा रस सकाळ-संध्याकाळ एक-एक वाटी दिल्यास रोहिण्यांमध‍ील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.

* दुधीभोपळ्याचा रस एक वाटी, लिंबाचा रस एक चमचा व एक चमचा मध एकत्र करून दिल्यास मुत्रविकार कमी होतात.

* रोज सकाळी काही न खाण्याआधी अर्धा वाटी दुधीभोपळ्याचा रस व एक चमचा आल्याचा रस पाण्यात मिसळून घेतल्यास स्थूलपणा कमी होतो.
  लोह, कॅल्शियम, फॉस्फरस व अन्य खनिजे आहेत. तंतुमय, रेषादार तसेच जीवनसत्त्व 'क' असलेली फळभाजी दुर्लक्षित आहेत. मात्र, आता हळूहळू त्यांचे महत्त्व नागरिकांना पटत असल्याने ते खाण्याचे प्रमाण वाढले आहे.      

* दुधी भोपळ्याच्या एक वाटी रसात एक चमचा मध व चिमुटभर जायफळ पूड ‍मिसळून तयार झालेला तेप त्वचेवर लावल्याचा कांती उजळते.

* एक चमचा आवळा चुर्ण भोपळ्याच्या रसात रात्री कोमट पाण्यात घेतल्याने झोप चांगली लागते. तसेच पोट साफ होते.

* दुधी भोपळ्याचा एक वाटी रस एक चमचा ओवा, चिमुळभर काळेमीठ घालून गरम करून ते चाखल्याने पोटाचा फुगीरपणा कमी होतो.

* दुधीभोपळ्याचा रस आटवून त्यात एक मिरा व पिंगळी वाटून त्यात एक चमचा मध मिसळून त्याचे चाटण लहान मुलांना दिल्यास छातीतील कफ दूर होतो.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा