' कॅन्सर' या महाभयानक रोगावर जालीम औषध अद्याप निघालेले नाही, हे खरे आहे. जर आपण काही गोष्टी लक्षात घेतल्या तर कॅन्सर आपल्या शरीराला स्पर्श करू शकत नाही. भावनात्मक वातावरणात वावरणे म्हणजे कॅन्सरला अप्रत्यक्षरित्या आमंत्रण देणे होय. 'कॅन्सर' हा महाभयंकर आजारापासून सावधगिरी म्हणून काही टिप्स......1. आपण अशा व्यक्तिसोबत शारीरिक संबंध ठेवले आहेत की त्याला पॅपिलॉमा व्हायरसने ग्रासले आहे. त्यामुळे तुम्हाला ही त्याची लागण होऊ शकते. कारण हा व्हायरस संसर्गजन्य असतो. यासाठी निरोगी जोडीदाराची निवड करा.2. हिरवे पालेभाज्या, हरभरे व फळांचा आपल्या दररोजच्या आहारात समावेश असला पाहिजे. पालेभाज्या व फळे लोहयूक्त असल्याने रोगाशी दोन हात करण्यास ते सहकार्य करतात. फूलगोभी, पत्तागोभी, टोमॅटो, गाजर आदी फळभाज्या जास्त प्रमाणात सेवन केले पाहिजे. 3. साखर किंवा साखरयुक्त पदार्थ शक्यतो कमी प्रमाणात सेवन केले पाहिजे. एका निरीक्षणात असे आढळले आहे की, महिलामध्ये असलेला कोलोरेक्टल कॅन्सर होण्याची संभावना साखर सेवन केल्याने वाढते. 4. आपण दररोजच्या आहारात जे तेल सेवन करत आहात. ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे किंवा नाही. हे आधी पाहिले पाहिजे. ऑलिव ऑइल किंवा कोकोनट ऑइलचा उपयोग भोजन तयार करताना करावा. 5. कमीत कमी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा उपयोग केला पाहिजे. | | 'कॅन्सर' या महाभयानक रोगावर जालीम औषध अद्याप निघालेले नाही, हे खरे आहे. जर आपण काही गोष्टी लक्षात घेतल्या तर कॅन्सर आपल्या शरीराला स्पर्श करू शकत नाही. |
| |
6. गर्भनिरोधक गोळ्यांचे दिर्घकाळापर्यंत सेवन करू नये. गर्भनिरोधक गोळ्या दिर्घकाळ सेवन केल्याने महिलाना स्तन कॅन्सर व लिव्हर कॅन्सर होण्याची भिती वर्तवली जाते. हृदयविकाराची ही समस्या अधिक असते. हॉरमोनच्या संबंधित कुठल्याच थेरपीच्या उपयोग करू नका. 7. आपले वजन संतुलित ठेवा. लठ्ठपणामुळे स्तन कॅन्सर होण्याची शक्यता आहे. 8. वातावरणात पसरलेल्या प्रदूषणापासून सावधगिरी बाळगा.9. 24 तासातून साधारण 8 ते10 तासांची झोप आरोग्यास आवश्यक आहे. 10. धूम्रपान करू नका किंवा इतर प्रकारचे गुंगी येणार्या पदार्थांचे सेवन करू नका. 11. शारीरिक काम करत रहावे. कुठलेही काम असो त्यात स्वत:ला व्यस्त करून घ्या. नियमित व्यायाम केला पाहिजे. 12. मीठाचे सेवन संतुलित प्रमाणात करा. मीठाचे जास्त सेवन केल्यास पोटाचा कॅन्सर होण्याचा धोका असतो. 13. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भावनांना नियंत्रित ठेवायला शिकले पाहिजे. जास्त भावूकपणा ही कॅन्सरला आमंत्रण देऊ शकतो. आपण किती पौष्टिक आहार घेत आहात परंतु तनाव व भावनात्मक वातावरणात वावरत असाल तर त्या पौष्टिक आहाराचा आपल्या आरोग्यावर कुठलाच अनुकूल परिणाम होणार नाही. |