प्रत्येक वयात रहा फिट...
|
वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यात स्वत:ला ओळखा....
वयाच्या 30 वर्षापर्यत तीस मीटर अंतरावरील झाडाचे पडते पान जर तुम्ही पाहू शकतात. तर समजा अजून दृष्टी चांगली आहे. एक मिनिटात आपले हृदय जर साठ वेळा धडधड करत असेल तर आराम न करता पुढच्या झुकून आपण कुठलीही वस्तू सहज उचलू शकतात. तरी आपण पूर्ण पणे फिट आहे.
जर आपण नेहमी बसूनच रहात असला तर एक सारखे न बसता आपल्या बसण्याच्या स्थितीत वारंवार बदल केला पाहिजे. लिफ्ट पेक्षा जिन्याचा प्रयोग केला पाहिजे. वयाचे 30 वर्ष म्हणजे तरूणाईतील टप्पा आहे. या वटात काही लोक मोठ्या आवाजात संगीत ऐकत असतात, हे पूर्णपणे चुकीचे आहे. अंधूक प्रकाशात वाचण करणे किंवा अधिक जवळून टीव्ही पाहिल्याने डोळ्यांमधील बबुळास सूज ही येऊ शकते. सिगरेट व व्यसनापासून दुर राहिले पाहिजे.
| |
| |
वर्षातून एक वेळा तपासणी आवशक्यक आहे. तीस वर्ष वयाच्या महिलांनी वर्षातून एक वेळा डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. कारण त्या स्तन कॅन्सरसारख्या महाभयानक आजारापासून त्या स्वत:ला वाचवू शकतात.
46-65 वयोवर्षात पदार्पण करताना आपले हृदय आपल्याकडून देखभालीची अपेक्षा व्यक्त करत असते. या वयात अधिक तनाव घातक ठरू शकतो. एका वर्षातून किमान एक वेळा डॉक्टराकडून हृदयाची तपासणी केली पाहिजे. सकाळी किंवा सायंकाळी पार्कमध्ये फिरणे फायदेशिर होऊ शकते.
|
66 किंवा त्यापेक्षा वयात वाटचाल करताना शरीर थकते. या वयात मधुमेह सारख्या आजाराच्या व्याधी जडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा स्थितीत ब्लड व शुगर याची वारंवार तपासणी करणे आवश्यक असते. जास्त वजन व जे लोक धुम्रपान करतात त्यांना तर हृदयाची ही काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते.
जसजसे म्हातारपण जवळ येते तशी आपली हाडे ठिसूळ होतात. त्यासाठी जीवनात कॅल्शियमयुक्त आहार घेऊन व्यायाम केला पाहिजे. असे केल्यास आपण कुठल्याही वयात फित राहाल.
