केळी : संपूर्ण आहार
|
पिकलेल्या केळीत आयोडीन, साखर व प्रोटीन आढळतात तर कच्च्या केळीत कॅल्शियम अधिक असते. कच्च्या केळीची भाजी ही केली जाते.
दररोज दोन केळी खालनयाने शरीराला आवश्यक असे सर्व प्रकारच्या विटॅमिनची पूर्तता होते. सकाळी उठल्यानंतर दोन केळी खाल्यानंतर कोमट दूध पिले पाहिजे. दररोज केळीचे सेवन करणारी व्यक्ति नेहमी स्वस्थ असतात. नैसर्गिक दृष्टा पिकलेली केळी आरोग्यास उत्तम असते.
केळी खाल्याने पचनक्रिया सुरळीत चालते. एक ग्लास दूधात एक चमचा शुध्द तूप, चिमुटभर इलायची पुड मिसळा, एक केळी खा व त्यानंतर एका दमात दूध गटकावे. अशाप्रकारे दररोज दोन केळी खाल्याने शरीर सुडौल, सुदृढ होत असते. वीर्य तसेच शुक्राणूची (स्पर्म) वृध्दी होते. स्मरणशक्तीसह कामशक्ती ही वाढते. महिलांमध्ये प्रदर रोग ठीक करण्यास मदत होते.
दोन केळी, दोन चमचे मधुसोबत खाल्याने हृदयरोग तसेच हाई ब्लड प्रेशरच्या व्याधी असलेल्याना आराम पडतो. मूत्र समस्या सुटतात. काही दिवस दररोज कच्च्या केळीची भाजी खाल्यास पोटात असलेले जंत किंवा किटक मलमूत्राद्वारे बाहेर फेकले जातात.
| |
केळी व दमा- एक पिकलेले केळी सालट्यासहीत शेकावे. त्यानंतर सालटे काढून त्याचे केळी कापावे. त्यावर 15 काळे मिरे बारीक करून त्यावर टाकवे व ते दमा झालेल्या रोग्याला गरमा गरम खाण्यास दिल्याने आराम पडतो.
केळी व खोकला- एक पिकलेले केळी व आठ काळे खोचावे व पुन्हा वापस सालटे लावून खुल्या जागी ठेवून द्या. प्रातविधीला जाण्यापूर्वी त्या केळीत खोचलेले मिरे काढून ते केळी खावे. अशा प्रकारे काही दिवस घेतल्यास खोकला बरा होतो.

