कावीळ आणि कर्करोग
|
कावीळ होण्याची मुख्य तीन कारणे-
1. रक्तातील आजार (प्रिहीपेटीक)
2. जठराचे आजार (हिपेटीक)
3. पित्ताचे आजार ( पोस्ट हिपेटीक)
कावीळ (हेपिटायटीस) हा आजार जठरावर (लीवर) सूज आल्याने होत असतो. मात्र त्याची वेळीच तपासणी करून घेतली पाहिजे कारण काही अन्य कारणेही आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही. कावीळकडे सुरवातीलाच दूर्लक्ष झाल्यास भविष्यात तो अधिक गंभीर होऊ शकतो. जठार पित्त तयार होत असते. पित्त नलिकेद्वारे ते इतर अवयवाकडे वाहून नेले जातात. या नलिकेत अडथळा निर्माण झाल्याने होणार्या कावीळला वैद्यकीय संज्ञेत पोस्ट हिपेटीक म्हटले जाते. त्याला सर्जिकल हेपिटायटीस ही म्हटले जाते, कारण त्यावर उपचार ऑपरेशन करून केला जातो. सर्जिकल हेपिटायटीसमुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते, त्यातील मुख्य व गंभीर आजार म्हणजे कर्करोग (कॅन्सर) होय. कर्करोगाचे वेळीच निदान झाल्यास त्याच्या संपूर्ण नायनाट केला जाऊ शकतो. मात्र, नागरिकांमध्ये जनजागृतीचा अभाव असल्याने या गंभीर आजाराकडे दूर्लक्ष होत असून तो अंतीम चरणात आल्यानंतर रुग्ण उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पोहतात. अशा वेळी आजार 'लास्ट स्टेप'वर पोहचल्याने डॉक्टरही हतबल असतात. त्यामळे कावीळची लक्षणे वेळीच समजली पाहिजे व त्यावर डॉक्टरांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे.
सर्जिकल हेपिटायटीस होण्याचे मुख्य कारणे-
1. पित्त नलिकेत अडथळा निर्माण होणे
2. पित्त पिशवीचा कर्करोग
3. पित्त नलिकेतील कर्करोग
4. पेक्रीयासला असलेली सूज
5. जठराचा कॅन्सर
6. पित्त नलिकेत बॅक्टेरिया
7. लहान आतड्याचा कॅन्सर
कॅन्सरपासून होणारा सर्जिकल हेपिटायटीसची लक्षणे -
|
1. पोटात न दुखणे.
2. भूख न लागणे.
3. उल्ट्या व न थांबणारे जुलाब होणे.
4. वजन कमी होणे.
5. पाठीत दुखणे.
6. नखे, डोळे व संपूर्ण शरीर पिंगट पडणे.
या लक्षणांकडे रुग्णांचे मोठ्याप्रमाणात दूर्लक्ष होते. हातातून वेळ निघून गेल्यावर सर्व प्रकारच्या चाचण्या पूर्ण केल्यानंतरही रुग्णावर उपचार करणे डॉक्टरांना असंभव होऊन बसते.
काय केले पाहिजे?
कावीळ हे कर्करोगाचे लक्षण आहे. रक्त तपासणी तसेच सोनोग्राफीच्या माध्यमातून निदान करता येऊ शकते. कावीळ कुठल्या प्रकारातील आहे, हे तपासणे अत्यंत आवश्यक असते. कर्करोगाचे काही लक्षणं जाणवल्यास सीटी स्कॅन, एमआरआय, एंडोस्कोपी, ईआरसीपी, एंडोस्कोपिक व सोनोग्राफी सारख्या अत्याधुनिक चाचण्याची गरज भासू शकते. या चाचण्यांद्वारे आपल्याला कॅन्सर कुठल्या स्टेजवर आहे. याचीही माहिती होत असते. पहिल्या स्टेजमध्ये असलेल्या कॅन्सरला रेडिकल सर्जरीद्वारे बाहेर काढला जातो. अॅडव्हान्स स्टेजमध्ये असलेला कॅन्सर कीमो किंवा रेडिओ थेरपीद्वारे उपचार केला जातो. मात्र कर्करोगाचा मुळापासून नायनाट करण्याची शक्यता नसतेच. त्यामुळे कावीळवर योग्य वेळी उपचार करणे महत्त्वाचे आहे.
