1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य सल्ला

स्‍वाइन फ्ल्‍यू म्हणजे काय?

- विकास शिरपूरकर

PTI
मॅक्सिकोमध्‍ये स्‍वाइन फ्ल्‍युची लागण झाल्‍याचे लक्षात आले आणि त्‍यानंतर अमेरिका, ब्रिटनसह जगभरात या रोगाचे संक्रमण वेगाने पसरू लागले आहे. या संदर्भात आरोग्य यंत्रणा सज्ज असल्‍या आणि हा रोग इतरत्र पसरू नये यासाठी प्रयत्‍न केले जात असले तरीही त्‍्याची व्‍याप्‍ती वाढत ते भारतापर्यंत आणि पुण्‍यातही येऊन पोचली आहे. दक्षता म्‍हणून जागतिक आरोग्य संघटनेने महामारी जाहीर केली आहे. शासन पातळीवरून प्रयत्‍न केले जात असले तरीही प्रत्‍यक्ष नागरिकांनीही दक्षता घेण्‍याची आवश्‍यकता आहे.

मुख्‍यतः डुकरांमध्‍ये टाईप ए एनफ्ल्‍युएन्‍जा विषाणुंच्‍या संक्रमणामुळे स्‍वाइन फ्ल्‍यूची लागण होते. या रोगाचा संबंध मुख्‍यतः श्‍वसन प्रक्रियेशी येत असल्‍याने यास श्‍वास रोग असेही काही ठिकाणी म्‍हणतात.

Tamiflu किंवा Relenza यासारखी औषधे घ्‍यावीत. मात्र या रोगापासून बचावासाठी आधीच ही औषधे अजिबात घेऊ नयेत. याशिवाय या आजारापासून बचावासाठी तुळशीच्‍या पानांचा किंवा मंजुळ्यांचा चहा घेतल्‍यास या आजाराची लागण होण्‍याची शक्यता कमी असते.
सामान्‍यतः या रोगाचा विषाणू मनुष्‍यावर प्रभावी ठरत नाही अशी धारणा होती. मात्र गेल्‍या काही वर्षांत समोर आलेल्‍या संशोधनानुसार या रोगाच्‍या विषाणुची लागण आता मनुष्‍यालाही होऊ लागली आहे. या रोगाचा फैलाव मुख्‍यत्वे वराह पालन करणारे आणि त्‍यांचे मांस विक्री किंवा भक्षण करणारे यांच्‍याद्वारे होण्‍याची दाट शक्यता असते.

अतिशय वेगाने पसरणा-या या रोगाची लक्षणे सर्वसामान्‍य फ्ल्‍यू सारखीच असतात. शिंकणे, खोकणे, संक्रमित सार्वजनिक वापराच्‍या वस्‍तूंना हाताळणे किंवा श्‍वासाद्वारेही या रोगाचा वेगाने फैलाव होऊ शकतो. 1976 मध्‍ये सर्वप्रथम या रोगाची ओळख झाली.

या रोगाची लक्षण

सामान्‍य मानवी फ्ल्‍यू प्रमाणेच याची लक्षणे आहेत. ताप येणे, खोकला येणे, घशाला कोरड पडणे, अंग व डोकेदुखी आणि मळमळून उलट्या होणे ही याची प्रमुख लक्षणे आहेत.

या रोगापासून बचावाचे उपा

या रोगाची लागण आणि संसर्ग होऊ नये यासाठी नाक आणि तोंड मास्‍कने झाकून ठेवणे उत्तम. सार्वजनिक स्‍वच्‍छता गृहाच्‍या नळाचा, गाडीच्‍या दरवाज्‍याचा, सायबर कॅफेवरील माऊस किंवा कीबोर्डचा वापर केल्‍यानंतर हात साबणाने वरचेवर स्‍वच्‍छ करावेत. जर आपल्‍यात अशा प्रकारच्‍या रोगाची लक्षणे दिसत असतील. तर त्‍वरित डॉक्टरांचा सल्‍ला घेऊन घरीच थांबलेले बरे.

स्‍वाइन फ्ल्‍यू अतिसंसर्गजन्‍य आहे किंवा नाही हे अद्याप वैज्ञानिक दृष्‍ट्या सिध्‍द झाले नसले तरीही सामान्‍य फ्ल्‍यू प्रमाणे त्याचा फैलाव होत असल्‍याने त्‍याला संसर्गजन्‍य म्‍हटले जात आहे. फ्ल्‍यूचा विषाणू बाहेरील वातावरणातही बराच वेळ तग धरून राहू शकतो.

स्‍वाइन फ्ल्‍यूवर उपाय आहेत का?

होय, अशी लक्षणे दिसल्‍यास Tamiflu किंवा Relenza यासारखी औषधे घ्‍यावीत. मात्र ती घेताना त्‍यांची मुदत संप‍लेली नाही ना याची खात्री करून मगच घ्‍यावीत. मात्र या रोगापासून बचावासाठी आधीच ही औषधे अजिबात घेऊ नयेत. याशिवाय या आजारापासून बचावासाठी आयुर्वेदाने पर्याय सांगितले आहेत. त्‍यानुसार तुळशीच्‍या पानांचा किंवा मंजुळ्यांचा चहा घेतल्‍यास या आजाराची लागण होण्‍याची शक्यता कमी असते.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा