1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य सल्ला

वार्‍यात जाताना कान झाकावेत

ND
1. सतत मोठ्या आवाजाच्या संपर्कात आल्याने श्रवणक्षमता हळूहळू कमी होत जाते. फटाके, रहदारी, बोलण्याचा आवाज आदी आवाजांच्या मार्‍याने कानावर दुष्परिणाम होतो. त्यामुळे एकतर अशा आवाजांपासून लांब राहावे, ते शक्य नसल्यास कानात कापसाचे बोळे घालावेत.

2. कानाला इअरफोन लावून सतत एफएम ऐकल्यास, बंद कारमध्ये मोठ्या आवाजात संगीतसुरू असल्यास कानास त्रास होतो. दोन्ही ठिकाणी आवाजाच्या लहरी बाहेर पडण्यासाठी जागा नसल्याने कानावर तण येतो.

3. कान साफ करण्यासाठी कान कोरणे, काडेपेटीतील काडी, बड्स वापरले जातात. त्यामुळे आपण कानातला मळ बाहेर न काढता उलट आत ढकलत असतो. कानाचा पडदा अतिशय नाजूक असतो. त्याला जरा जरी स्पर्श झाला तरी कान दुखतो. त्यामुळे या वस्तू वापरू नयेत.

4. वार्‍यावर जाताना कान झाकावेत वा रुमाल बांधावा. गार वारा कानात गेल्यास तापमान कमी होऊन सायनसचा त्रास होण्याची शक्यता असते.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा