दातांची काळजी कशी घ्याल?
|
2. सतत कोल्ड ड्रिंक प्यायल्याने दात झिजतात. अतिशय थंड पदार्थ प्यायल्याने जिभेवर, नसांवर परिणाम होतो. जिभेची चव घेण्याची क्षमता कमी होते.
3. सतत चहा व कॉफी प्यायल्यास दातावर त्याचे कण चिकटून राहतात. त्यामुळे पिऊन झाल्यावर चूळ भरावी. अतिशय गरम चहा-कॉफी घेतल्यास गालाच्या अस्तरला इजा होऊन कॅन्सर होण्याची शक्यता असते.
4. सायनसच्या त्रासाचा दातांवर परिणाम होतो. अतिशय थंड व गरम पदार्थांमुळे सायनसचा त्रास होतो.
5. कडू, आंबट, तुरट असे सर्व प्रकारचे रस खाणे आवश्यक आहे. यामुळे दाताच्या शिरा मोकळ्या होतात. अती आंबट, गोड, तिखट खाऊ नये. केवळ मऊ अन्न घणे टाळावे. गाजर, मुळा, कणीस खालल्याने दातांना व्यायाम मिळतो. दात बळकट होतात.
