स्थूलपणा धोकेदायकच!
PR
PRस्थूलपणाची कारणे-
* अतिप्रमाणात खाणे आणि कमी शारीरिक श्रम दोघेही मिळून स्थूलपणा निर्माण करतात.
* ऊर्जेचं ग्रहण आणि ऊर्जेचा खर्च यांच्यात तीव्र असमतोल झाल्यानं स्थूलपणा आणि लठ्ठपणा उद्भवतो.
* आहारातून अतीप्रमाणात चरबी घेण्यामुळंही स्थूलपणा येतो.
* गुंतागुंतीची वर्तणूक आणि मानशास्त्रीय कारणांमुळं देखील अति अन्नसेवन आणि परिणामी लठ्ठपणा येतो.
ऊर्जेच्या वापरातील चयापाचयिक चुका मेद साठण्यास उत्तेजन देऊ शकतात.
* बालपण आणि पौगंडावस्थेतील स्थूलपणा यांच्यामुळं प्रौढावस्थेत स्थूलपणा येऊ शकतो. महिलांमधे, गर्भधारणेच्या वेळेस आणि रजोनिवृ्त्तीनंतर स्थूलपणा येतो.
वजन कसे कमी कराल!
* तळलेले अन्न कमी खावे.
* फळे आणि भाज्या अधिक प्रमाणात खाव्यात.
* संपूर्ण धान्य, हरभरे आणि मोडवलेलं धान्यं यांसारखे तंतुमय अन्न पदार्थ अधिक प्रमाणात खावेत.
* शरीराचं वजन सामान्य पातळीत राखण्यासाठी नियमितपणे व्यायाम करावा.
* शरीराचं वजन हळू आणि स्थिरपणे कमी करणे हितकारक.
* अती प्रमाणात उपवास करण्यानं आरोग्य धोक्यात य़ेऊ शकतं.
* आपल्या शारीरिक कार्यांचा समतोल राखण्यासाठी आवश्यक विविध प्रकारचे अन्न पदार्थ खावेत.
* अन्न थोडे-थोडे आणि नियमित अंतराने खावे.
* साखर, चरबीयुक्त पदार्थ आणि मद्याचे प्रमाण कमी करावे.
* कमी स्निग्धता असलेले दूध घ्यावे.
* वजन कमी करणारा आहार हा प्रथिनांनी समृध्द आणि कर्बोदकं तसंच चरबी कमी असलेला असावा.
