'प्रेम' हा काही प्रायोजित कार्यक्रम नही की, इच्छेनुसार केले अथवा इच्छा नसली म्हणजे थांबविला. 'प्रेम' मानवी भावना आहे. तिच्यावर कोणाचेही 'राज' चालत नाही. 'प्रेम' हे 'स्टॉप वॉच' तर मुळीच नाही. म्हणजे मर्जी असली की सुरू केलं व मर्जी नसली की बंद. 'प्रेम' तर अमृताचा झरा आहे. तो निरंतर सुरूच रहाणार आहे.
पौंगडावस्थेत (ज्याला आजच्या भाषेत 'टिनऐजर्स' म्हणतात) प्रेमाची बाधा झाली नसेल अशी व्यक्ती विरळाच म्हणावी लागेल. वयाच्या 12 ते 14 वर्षांत प्रेम ही भावना मनात जागृत होऊ लागते. आपल्या आयुष्यातील हे अपघाती वळणच असते. या वयातही हल्ली अनेक अफेअर्स होत आहेत. त्याला 'टीन एज लव्ह अफेअर्स' असे म्हणतात.