भारताच्या 58 व्या प्रजासत्ताक दिनी लष्करातील सर्वोच्च सन्मान असलेल्या अशोक चक्र पुरस्काराने सैनिकांना सन्मानित करण्यात येते. यंदाच्या प्रजासत्ताकदिनी मूळचे केरळमधील असलेल्या कॅप्टन हर्षन यांना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात येणार आहे. कुपवाड्यात अतिरेक्यांशी झुंज घेता घेता कॅप्टन हर्षन यांनी जखमी अवस्थेतही आपल्या तुकडीचे नेतृत्व करत तीन अतिरेक्यांनी यमसदनी धाडले होते. अतिरेक्यांना ठार केल्यानंतरच भारतमातेच्या या पुत्राने प्राण सोडले.
राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते कॅप्टन हर्षनच्या माता-पित्यांना गौरविले जाणार आहे. या पुरस्काराने कॅप्टन हर्षन यांचे नाव डेहराडूनच्या लष्करी अकादमीच्या... |