| सोरटी सोमनाथ- काठेवाडचे दक्षिणेस असलेल्या वेरावळ बंदराला समुद्रमार्गाने आणि रेल्वेने जातां येते. वेरावळहून प्रभासपट्टण तीन मैल लांब आहे. प्रभासपट्टमला सोमनाथाचें देऊळ आहे. क्षय नाहींसा होण्याकरितां सोमानें (चंद्राने) लिंग स्थापून पूजा केली, म्हणून ते सोमनाथ या नावाने प्रसिद्ध झाले. मल्लिकार्जुन - गुंटकल बेसवाडा - या छोट्या लाइनवर नंद्याळ स्टेशन आहे. तेथून 28 मैलांवर असलेल्या आत्माकुमार गांवाला मोटारीने जावें लागतें. आत्माकुरहून मल्लिकार्जुन 43 मलै श्रीशैल्यपर्वतावर आहे. रागावून गेलेल्या कुमार कार्तिकेयाला भेटण्याकिरतां (मल्लिका) पार्वती व अर्जुन (शंकर) येथें आले म्हणून मल्लिकार्जुन या नावाने प्रसिद्ध... |